किनवट (ता.प्र.) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाव तेथे राष्ट्रवादी माणूस तिथे घड्याळ रुजवण्यासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आवाहन दिनांक 31 जानेवारी रोजी एन के गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले आहे.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर भोकर तालुका महिला अध्यक्ष सौ यशोदाबाई शेळके, सो बेबीबाई प्रदीप नाईक मंजुळाबाई प्रकाश राठोड यांच्यासह महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सौ. बेबीताई प्रदीप नाईक,सुनंदा सुधाकर तीगलवाड, माधुरी बालाजी बामणे, अनुसया सत्यनारायण जमादार, उषाताई बालाजी वाढवे, उज्वलाताई तुषार मुंडावरे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात अच्छे दिन येणार असल्याचे म्हणत सर्वच महिलांनी आपापल्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असेही आपल्या मनोगत आतून व्यक्त केले. याप्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर व मान्यवरांच्या हस्ते महिलांना नियुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान सकाळपासूनच एन के गार्डन येथे महिलांची प्रचंड गर्दीने परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद, प्रदीप नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है क्या घोषणाने परिसर दुमदुमले त्यामुळे यांचे गार्डन परिसर राष्ट्रवादीमय झाला होता हे विशेष! कार्यक्रमाचे सुत्रसचलन कीर्तिका राजू सुरोशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जोषणा राहुल नाईक यांनी मानले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन किनवट तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे, उपसभापती राहुल नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बालाजी बामणे यांनी केले होते तर सदरील महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता प्रवीण म्याकलवार, पंचफुलाबाई शिवराम जाधव, नगरसेविका करुणा अरुण आळणे, शेवंताबाई मधुकर जाधव, शिवकांता गजानन मुंडे, विद्याताई संतोष दासरवार, लावण्या राजेद्र उपलवार,प्रणिताताई गजानन सोळुंके, मीराबाई लक्ष्मण देशमुख, शेख. अरफाना, विद्या प्रकाश जाधव, सुनिता संतोष जाधव,निता जयपाल जाधव यांच्यासह हजारोच्या संख्याने महिलांची उपस्थिती होती.