माहूर , दि. ४(प्रतिनिधी) राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून शासन आपल्या दारी अभियानाचा दुसऱ्या टप्पा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध लाभाच्या योजनेची माहिती व्हावी तसेच दुर्धर आजारवर उपचार घेण्यासाठी मुंबई, संभाजी नगर येथील हॉस्पिटल सुविधा बाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी तसेच आरोग्य विभागातील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक आकाश चाफाकानडे,तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, भाजप तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर,जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांनी शासन आपल्या दारी अभियानातील दुसऱ्या टप्प्यात विविध महाआरोग्य शिबीर व शासकीय योजनेचा महामेळावा व शासकीय योजनेची माहिती व नोंदणी या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी दि. ५ फेब्रुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार , दि.६ फेब्रुवारी वानोळा जिल्हा परिषद शाळा प्रांगण वानोळा, दि.७ फेब्रुवारी सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय माहूर, ग्रामीण रुग्णालय माहूर, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, शासकीय नेत्र रुग्णालय मांडवी यांच्या सौजन्याने या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मोतीबिंदू तपासणी मोफत शस्त्रक्रिया रक्त तपासणी, शुगर तपासणी बीपी तपासणी, यासारख्या सर्व आजारावर उपचार व मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
*शासन आपल्या दारी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू* *आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन*
88 Views