KINWATTODAYSNEWS

अण्णा भाऊ साठे यांनी जे भोगल,जे अनुभवल तेच आपल्या साहीत्यात उतरवल ; पुण्यतिथी निमित्त किनवट येथे अभिवादन कार्यक्रम सम्पन्न

किनवट, ता.१८ ता प्र. अण्णा भाऊ साठे यांनी जे भोगल,जे अनुभवल तेच आपल्या साहीत्यात उतरवल.स्वप्न भरारी त्यांनी मारली नाही. त्यांचे विचार हे कष्टकरी, कामकरी, वंचितासाठी मार्गदर्शक आहेत.”जग बदल घालूनी घाव,सांगून गेले मला भीमराव”,या विचाराप्रमाणे आचरण करण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज (ता.१८)सकाळी १० वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष,संघटना व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,माजी नगराध्यक्ष व्यंकराव नेम्मानीवार,रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, बालाजी मुरकुटे,राज माहूरकर, महेंद्र नरवाडे,उत्तम कानिंदे, प्रा.डॉ. सुरेंद्र शिंदे, “लसाकम”,या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.तलवारे यांची प्रमुख उपस्थिती होते. सूत्रसंचालन मारोती सुंकलवाड यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, सतिष बोंतावार,एड.उदय चव्हाण, किरण कलगोटवार, डी.एन.बट्टुर,तुकाराम मशिदवार,समाजाचे अध्यक्ष शिवन्ना कलगोटवार,नरसिंग दोनकोंडवार,बापूराव दोनपेल्लीवार, विवेक ओंकार,मधुकर आन्नेलवार,लक्ष्मिपती दोनपेल्लीवार, आकाश भंडारे,रमेश दिसलवार,धनाजि बसवंते, एड.मिलिंद सर्पे, दयानंद काळे,संजय कांबळे,चिन्नया माहूरकर,भगवान मारपवार,क्रष्णकांत सुंकलवाड,ईस्तारी कुंटलवाळ,नरेश माहूरकर, रेणुदास मुनेश्वर, अर्जुन मारपवार के.स्वामी,रवी उप्पलवार,नरसिंग दोनकोंडावार,चिन्नया माहूरकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

127 Views
बातमी शेअर करा