KINWATTODAYSNEWS

*रतनीबाई राठोड शाळेचा “चित्ररथ” ठरला किनवट शहराचे आकर्षण……!*

किनवट: 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने किनवट शहरातील नामांकित शाळा रतनीबाई राठोड प्राथमिक शाळेचे अध्यक्ष माननीय ॲड.श्री.सचिनजी राठोड साहेब यांच्या प्रेरणेने व शाळेच्या शिक्षिका श्रीमती वैशाली लांबसोंगे यांच्या कल्पनेतून शाळेच्या शिक्षक वर्गाने “सोशल मीडिया” (मोबाईल) चा अतिरेक यावर आधारित “चित्ररथ” तयार करून “बेटी हिंदुस्तान की” या लेझीम पथकासह किनवट शहरातून मिरवणूक काढण्यात आली या चित्ररथाच्या माध्यमातून सोशल मीडिया (मोबाईल) वापराचा जनमानसात कसा अतिरेक होतोय अशा सोशल मीडियाच्या अतिवापराने लहानांपासून थोरांपर्यंत जनमानसांच्या जीवनावर कसा परिणाम होतो त्याचे तोटे व प्रमाणात वापरल्याने होणारे फायदे तसेच सोशल मीडिया (मोबाईल) मुळे जवळ आलेले जग व प्रत्यक्ष माणूस माणसापासून कसा दुरावला त्याचा माणसात होणारा संवाद कसा कमी झाला अशा अनेक बाबींचा संदेश जनमानसात या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आला हा चित्ररथ व लेझीम पथक प्रजासत्ताक दिनी किनवट शहराचे आकर्षण ठरले होते.


यात नुर्वी, अनमोल, रितिका, अनिकेत, तपनकुमार,सत्यजित, अभय, निर्भय, स्वातिक, नैतिक, सिद्धार्थ, यज्ञश्री,ओवी, समक्ष, तनुश्री, अथर्व, आदी शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या सहभागी विद्यार्थ्यांवर किनवट शहरातील अधिकारी व नागरीक यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला तर हा चित्ररथ व लेझीम पथक तयार करण्यासाठी श्रीजाधव(मु.अ.),श्री.तामगाडगे,श्री.बुर्रेवार,श्री.सिरमनवार,श्रीमती चाडावार,श्रीमती लांबसोंगे,श्रीमती शिंदे, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. उपजिल्हाधिकारी श्री.कार्तिकेयन एस. साहेब, तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव मॅडम, नायब तहसीलदार श्री.राठोड साहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड.श्री. सचिनजी राठोड साहेब, अध्यक्षा श्रीमती स्वातीताई राठोड मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री.बने साहेब, विस्तार अधिकारी श्री.मोकळे साहेब,श्री. महामुने साहेब,श्री. कर्‍हाड साहेब, केंद्रप्रमुख श्री.राठोड साहेब,श्री.कानिंदे सर व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

451 Views
बातमी शेअर करा