KINWATTODAYSNEWS

*पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ मार्गदर्शनाचा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२९.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.नांदेडच्या वसरनी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सभागृहात दूरदृश्य प्रणाली द्वारे एलसीडी प्रोजेक्टरवर या मार्गदर्शनाच्या अभूतपूर्व मेजवानीचा लाभ घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पार्श्वभूमी विशद केली. महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा एकाग्रतेने लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेच्या अनुषंगाने केलेले मार्गदर्शन विद्यार्थी शांतचित्ताने ऐकून घेताना दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेच्या संदर्भाने त्यांचे स्वानुभव यावेळी विद्यार्थ्यांसमोर कथन केले.परीक्षा तणाव मुक्त होऊन या प्रक्रियेला कसे सामोरे गेले पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. वसंतराव नाईक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यासंबंधी आपल्याला या मार्गदर्शनाचा भविष्यात निश्चितच लाभ होईल, असे मत बोलून दाखवले.

यावेळी उप प्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड,प्रा.एन.पी.दिंडे, डॉ.जगदिश देशमुख,डॉ.एस.व्ही शेटे,डॉ.आर.एम.कांगणे,डॉ. यु.एस.कानवटे, डॉ.एस.बी.गरुड,डॉ.साहेबराव मोरे, डॉ.गणेश लिंगमपल्ले,डॉ. विजय मोरे,डॉ.साहेबराव शिंदे,
कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड,प्रा.कोतवाल,प्रा. देवकते,प्रा.मुस्तापुरे,प्रा.शेख, प्रा.झांबरे,प्रा.सुधळकर मॅडम, प्रा.जायदे मॅडम,
यांच्यासह वसंतराव नाईक महाविद्यालयातील वरिष्ठ तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

75 Views
बातमी शेअर करा