*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.३०. जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील नवाजलेली एंजल्स एज्युकेशन स्कुल च्या वतीने THR फँक्शन हॉल येथे २६ जानेवारी स्वतंत्र दीना निमित्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले,इंग्रजी, मराठी, उर्दू,हिंदी अशा प्रत्येक भाषेत भाषणे दिली,राज्यघटनेची मूळ उद्दिष्टे,सामाजिक भान, मुलांचे योग्य संगोपन,अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांची भाषणे आणि त्यांची नाटके, कविता,भाषणे,आत्मविश्वास तसेच विज्ञान प्रकल्पांनी सर्वांची मने जिंकली,या कार्यक्रमातील विज्ञान प्रकल्प शाळेचे मुख्याध्यापक शेख मुखित सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले असून शाळेतील इतर सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.सर्वांनी कौतुक केले.
आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोईज सेठ साहब यांनी शाळेला ₹ 51,000 चा निधी देऊन शाळेच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले तसेच युनूस खान साहेबांनी 10 टॅब स्लेट, उस्मान सेठ 10 चांदीची नाणी, व इतरांनी सुद्धा मुलांचे कौतुक केले आणि रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले, व शेवटी विद्यार्थ्याना त्यांच्या क्रीडा, विज्ञान प्रकल्प व कामगिरीनुसार शहराच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खुसी,मुइजुद्दीन सेठ करखेलीकर,अ.गफ्फार साहब सरपंच, युनुस खान साहब, आबेद अली साहब, हकीम सरपंच साहब,इक्बाल सेठ, हाजी अल्ताफ साहब, जहीरुद्दीन पठाण सर,हाफेज इम्तियाज साहब, हाफेज अ.गफ्फार साहब, मौलाना अहद,मौलाना फौजान,उस्मान सेठ,इम्रान पटेल, सादेक करखेलीकर,खुर्रम पटेल,शेख इब्राहिम इब्बू भाई, शेख सद्दाम, इद्रिस पटेल,तौफिक इज्जू भाई, अयुब पटेल,आणि तामसाहून आले शाकीर पठाण साहब, शाहरुख पठाण साहब,एजाज खान साहब व तसेच अनेक जण व पालक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे,आणि आपला अमूल्य वेळ देणाऱ्या पालकांचे नवीद अहमद यांनी विशेष आभार मानले व तसेच एंजल्स एज्युकेशन स्कूलचे व्यवस्थापन आरिफ मोहम्मद,नवीद अहमद, ए.वासे,रहीम खान, अब्दुल समद,ताहेर अली,आणि कर्मचारी मनापासून आभार मानले
सरतेशेवटी,अनेक आनंदी चेहऱ्यांनी,मुलांचे कौतुक आणि टाळ्यांच्या कडकडाटाने कार्यक्रम रंगला.
एखाद्या उद्देशासाठी काळजीपूर्वक आणि समर्पित वृत्तीने केलेले प्रयत्न आणि परिश्रम निश्चितपणे यशस्वी होतात.