KINWATTODAYSNEWS

अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला.

वासी/मुंबई: मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली.

जरांगे पाटील यांना जीआर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वाशीमध्ये आले होते. यावेळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जीआर सुपूर्द केला. यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यात मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर पाच महिन्यांनतर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे.
सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जीआर स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात आला. जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली. जरागेंनी मुख्यमंत्री शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले,

396 Views
बातमी शेअर करा