KINWATTODAYSNEWS

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न*

यवतमाळ, नेर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने नुकताच निर्मल बंन्सी लॉन नेर येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी नेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल यांनी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पत्रकारांनी पत्रकार म्हणून काम करताना आपले सामाजिक भान व संवेदनशीलतेचा परिचय निश्चितच अधोरेखीत केला पाहिजे. तसेच दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईचे मीडिया हेड विजयकुमार बुंदेला यांनी पत्रकारितेतील नैतिकता व विवेक याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली पत्रकारिता अधिकाधिक पारदर्शक व वास्तवतेचं यथोचित चित्रण करणारी असावी. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नेर नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल यांनी भूषविले तर स्वागत अध्यक्ष म्हणून मानवाधिकार यवतमाळ जिल्हाध्यक्ष मकबूल खान (गामा भाई) यांची उपस्थिती होती.

यावेळी नेर अर्बन महाप्रबंधक प्रदिपभाऊ झाडे, भा.स.संस्था महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उमेशभाऊ मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे नेर शहर अध्यक्ष नसरुल्ला खान, सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसळे, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई पवार, प्रणिती व्यसनमुक्ती दारूबंदीच्या संगीताताई पवार, महिला मोर्चा भाजपाच्या जिल्हाध्यक्षा शिवानीताई गुगलीया, मानवाधिकार उपाध्यक्षा रेणुकाताई जयस्वाल, माजी नगरसेवक नितीन माकोडे, इम्तियाज लकडकुट्टा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष साजिद टिक्की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बंडूभाऊ बोरकर तसेच तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अतिशय आगळ्यावेगळ्या स्वरूपात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव वानखडे, जिल्हा सचिव अविनाश बनसोड, जिल्हा सदस्य सतीश उरकुडे, नेर तालुका अध्यक्ष जीयाउल्ला खान यांचे कल्पकतेने व संकल्पनेतून उत्तम असा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन विर, प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हा सचिव अविनाश बनसोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेर तालुका उपाध्यक्ष राहुल मिसळे, सचिव पंकज गुल्हाने, सहसचिव मनीष मेश्राम, कोषाध्यक्ष वसीम मिर्झा, संघटक रवी जयस्वाल, प्रसिद्धीप्रमुख पियुष भोयर, कायदेविषयक सल्लागार ॲड हरीश कठाने, जिल्हा सदस्य अमृत वासनीक, संजय आमटे, साजिद खान आदी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

100 Views
बातमी शेअर करा