KINWATTODAYSNEWS

*शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी मंगेश कदम पोहचले शासन दरबारी*

*देगलूर व बिलोली येथील पोलीस वसाहत तात्काळ बांधा*

*कुंडलवाडी व बिलोली नगर पालिकेला कायमस्वरूपी मुख्यधिकारी द्या*

*देगलूर व बिलोली येथे शासकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधा*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२१. जिल्यातील देगलूर – बिलोली मतदारसंघातील मतदारांच्या प्रश्नांसह देगलूर व बिलोली शहरातील शासकिय कर्मचारी यांच्या निवासस्थानचा प्रश्न,कुंडलवाडी व बिलोली नगर पालीकेत कायम स्वरूपी मुख्यधिकारी यांची नियुक्तीसह कांही प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने राज्याच्या मुख्ममंत्र्याशी अत्यंत जवळीकता साधलेले शिवसेना मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम हे शासन दरबारी पोहचले आहेत.त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर अवर सचिव प्रविण पाटील यांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन निवेदन सादर केल्या नंतर त्या निवेदनावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

अनेक लोकप्रतिनिधी आले अन् गेले मोठमोठ्या घोषणाही करण्यात आल्या तरी पण गेल्या अनेक वर्षा पासून येथील कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटलेला नाही.देगलूर-बिलोली मतदार संघातील देगलूर व बिलोली पोलीस ठाण्याअंतर्गत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब राहत असल्यामुळे त्यांना राहण्यासाठी पोलीस वसाहत नसून इतर ठिकाणी राहावे लागत आहे.सध्या येथील जुनी वसाहत ओस पडली आहे.जागा असून सुध्दा हे काम हाती घेतल्या जात नाही.

याच प्रमाणे पोलीस बांधवांना तानतनाव निर्माण होऊ नये,त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यायाम शाळा (जीम) उपलब्ध करुन दिल्यास त्यांचे शरीर नियंत्रनात व निरोगी राहील.याच सोबत गेल्या कांही पासून बिलोली व कुंडलवाडी
शहरासाठी कायम स्वरूपी मुख्यधिकारी नसल्याने शहरातील नागरीकांना पावलोपावली विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांना जन्म नोंदणी प्रमाणपत्र,मृत्यू प्रमाणपत्र,मुलभूत सुविधा पाण्याचाप्रश्न,साफसफाई,दिवाबत्ती या सारख्या सुविधा वेळेवर मिळत नाहीत.याच तुलनेत कुंडलवाडी नगरपालिकेचीही अवस्था अशीच आहे.येथील पदभार नायब तहसिलदार यांच्याकडे दिला आहे.

त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने कायमस्वरूपी मुख्यधिकारी द्यावे अशी मागणी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी त्यांच्या सोबत बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड हे उपस्थित होते.

देगलूर व बिलोली तालुक्यातील अधिकाऱ्यांना शासकीय निवास स्थाने उपलब्ध करून द्या

देगलूर व बिलोली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्यासाह अनेक कार्यालयातील मुख्य अधिकारी,कर्मचारी यांना शासकीय निवासस्थाने बांधून देण्यात यावी अशी हि मागणी मंगेश कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शासकीय निवासस्थाने नसल्याने मुख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राहावे लागत आहे.

170 Views
बातमी शेअर करा