*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१७.नायगाव सहा वर्षापूर्वी अकरा वर्षांच्या एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी गिरीष गंगाराम कोटेवाड रा.मराठा गल्ली, मुदखेड या नराधमाला बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने १७ जानेवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातल्या कुंटूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सावरखेड येथील ऋषीकेश शिवाजी आपतवाड,वय ११ वर्ष हा दि.०५/०९/२०१७ रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गावात सार्वजनिक गणेश विसर्जन असल्याने ऋषिकेश आणि त्याचे वडील शिवाजी दिगांबरराव आपतवाड हे गावातील सर्व लोकासोबत विसर्जन मिरवणूकीत गेले होते.
गणपती मिरवणूक ही जिल्हा परीषद शाळेकडून तळ्याकडे गेली असता ऋषीकेश व त्याचे वडील सांयकाळी ६ वाजता चे सुमारास घरी परत आले. त्यानंतर ऋषीकेश जेवन करुन अंगनात खेळत होता.वेळ अंदाजे ६.३० च्या दरम्यान ऋषिकेश हा वडीलांची नजर चुकवून बाहेर खेळण्यासाठी गेला. तो बराच वेळ परत न आल्याने त्याचे वडील,आई, काका यांनी गावात आजुबाजूला शोधाशोध केली परंतु मुलगा ऋषीकेश मिळून न आल्याने ऋषिकेशचे कुटुंबीय घाबरून गेले.
दरम्यान गल्लीतील,गावातील लोक व घरचे सर्वच जण अंधार असल्याने बॅटरी घेऊन गावात शोध करु लागले. दरम्यान रात्री उशीरा ११.३० वाजताच्या सुमारास मारोती मंदीराच्या पाठीमागील नियोजीत मंदीराच्या शिखरा खालील स्लॅबच्या तळमजल्याच्या खोलीत पाहीले असता त्याठिकाणी ऋषिकेश प्रेत पडलेले दिसून आले. त्यावेळी त्याच्या उजव्या काना खाली मानेवर,गळ्यावर काचेच्या फुटक्या बॉटलीने जबर मारहाण करुन मोठी जखम झालेली दिसत होती.मुलाचा चेहरा व अंगावरील शर्ट रक्ताने भरलेले दिसत होते.त्याची पँट गुडग्या पर्यंत खाली ओढलेली होती.यावरून मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान मयत ऋषीकेशचे वडील शिवाजी दिगांबरराव आपतवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरुध्द कलम ३०२,३७७, भा.द.वि. व कलम ६ पोक्सो गु.र.न. १३१/२०१७, नुसार पो.स्टे. कुंटुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरिल गुन्हयाचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.सदरील विशेष खटला बाल संरक्षण क्रमांक १२/२०१७ मध्ये सरकातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले.व न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन मा. न्यायाधीशांनी दि. १७/०१/२०२४ रोजी आरोपी गिरीष गंगाराम कोटेवाड,रा. मराठागल्ली,मुदखेड यास फाशीची शिक्षा ठोठावली.