*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१७.मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी उपसभापती व काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ.ललिता मुकूंदराव शिंदे-बोकारे यांची महिला काँग्रेसच्या नांदेड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व भोकरच्या माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण यांच्या सूचनेवरुन महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. ललिता शिंदे-बोकारे या काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत.
यापूर्वी त्यांच्यावर सिडको महिला ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात मनपा नगरसेविका, महिला व बालकल्याण विभागाच्या उपसभापती, महिला काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा या पदावर यशस्वीपणे काम केले आहे.
शहरातील महिला काँग्रेसच्या संघटन वाढविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील माजी गटनेते अमरनाथ राजूरकर,माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,माजी महापौर मंगलाताई निमकर,काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मिनलताई खतगावकर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.