KINWATTODAYSNEWS

*गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा वृद्ध यात्रेकरू महिलेची अंगठी केली परत!*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड़*:दि.19.येथील सुप्रसिद्ध धार्मिक संस्था गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड येथे कार्यरत कर्मचारी स.नरेन्द्रपाल सिंघ (संजू) पिता शेरसिंघ सिलेदार याने एका वृद्ध भाविक महिलेची सोन्याची अंगठी परत करून प्रामाणिकतेचे उदाहरण प्रस्तुत केले आहे.घटना शुक्रवार, दि.19 जानेवारी दुपारीची आहे. मुंबईची रहिवाशी वृद्ध यात्रेकरू महिला मनमोहन कौर ओबेरॉय या दर्शनासाठी येथे आल्या होत्या.

त्या गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या गेट नंबर दोन येथील भाई दयासिंघजी यात्री निवास येथे थांबल्या होत्या. दुपारी मनमोहनकौर या रिसेप्शन कक्षा जवळील बाथरूम बाहेर येत असतांना त्यांची सोन्याची अंगठी खाली पडली.काही वेळानंतर तिथे रिसेप्शन मध्ये सेवेवर असलेल्या नरेंद्रपाल सिंघ सिलेदार यांना ती अंगूठी सापडली.नरेंद्रपालसिंघ यांनी भाविकांना विचारपूस केली. काही वेळेनंतर मनमोहनकौर यांना अंगठी गहाळ झाल्याचे लक्ष्यात आले.त्यांनी रिसेप्शन कक्षाशी संपर्क साधून अंगठी हरावल्याचे सांगितले.त्यावर नरेन्द्रपालसिंघ यांनी गुरुद्वारा सचखंड बोर्ड अधीक्षक ठानसिंघ बुंगाई, सहायक अधीक्षक रविंद्रसिंघ कपूर यांना माहिती दिली.नंतर ओळख पटवून त्यांनी सदर भाविक महिलेस अंगूठी परत केली. या प्रामाणिकपणामुळे नरेंद्रपालसिंघ सिलेदार यांची स्तुति होत आहे.नरेंद्रपाल सिंघ हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शेरसिंघ सिलेदार यांचा मुलगा आहे.

भाविक महिला मनमोहनकौर ओबेरॉय यांची गहाळ झालेली सोन्याची अंगठी परत करतांना गुरुद्वारा बोर्ड कर्मचारी नरेन्द्रपालसिंघ सिलेदार.रविंद्रसिंघ मोदी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

107 Views
बातमी शेअर करा