*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१९.महाराष्ट्र राज्य लोकसेवा ( एमपीएससी) आयोगकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य प्रशासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी , तहसीलदार,गटविकास अधिकारी,आदिवासी प्रकल्प,शिक्षणाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदि वर्ग १ च्या पदांच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी ( दि.१८ ) जाहीर करण्यात आला असून अंतिम गुणवत्ता यादीत कु.मंजुश्री माधवराव कल्लेवाड हिची मुलीत चौथ्या क्रंमाकावर निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव येथे कार्यरत असलेले लिपिक माधवराव कल्लेवाड यांची मंजुश्री कल्लेवाड ही सुकन्या असुन पुणे येथील सीईपीओ काॅलेजमधुन तिने पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे.
मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील मूळ रहिवासी तसेच बालपणापासूनच अभ्यासात हुशार आणि चुणचुणीत असलेली कु.मंजुश्री माधवराव कल्लेवाड ही नांदेड शहरातील कमला नेहरू कन्या शाळेतून दहावी तर सिडको नवीन नांदेड येथील शिवाजी विद्यालयातून विशेष प्राविण्याससह बारावी परीक्षेत उतीर्ण झाली आहे.
तसेच पुणे येथील सीईपीओ काॅलेजमधुन तिने पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे.दरम्यान लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कु.मंजुश्री कल्लेवाड हिने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.