!!देशासाठी व धर्म रक्षणासाठी लढा देणारे महान वीर योद्धा शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिघ जी महाराज यांची जयंती हर्ष उल्हासाने साजरी करण्यात आली!!
सविस्तर वृत्त असे की
दि:- 18जानेवारी
शिखधर्मांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची जयंती हुजूर साहेब नांदेड येथे. पारंपारिक पद्धतीने आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी पंचप्यारे गुरू आणि त्यांच्या सोबत भजन कीर्तन करीत. परदेशातील देशातील विविध राज्यातील विविध जिल्ह्यातील लाखो भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात हुजूर साहेब गुरुद्वारा येथून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभा यात्रेमध्ये लहान मुल मुली, युवा, वरिष्ठ ,महिला व पुरुष यांनी भक्ती भावाने या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शोभा यात्रेमध्ये पारंपारिक शस्त्र प्रदर्शन करण्यात आले.
गुरुगोविंद सिंघ यांचे ऐतिहासिक वारसा असणारे अश्व अगदी पारंपारिक पद्धतीने सोन्या-चांदीच्या आभूषणाने सजवून या शोभायात्रेमध्ये दर्शनासाठी शहरात फिरवण्यात आले. शहरात ठीक ठिकाणी सर्व समाजातील भक्तांनी गुरु महाराजांच्या प्रतिमेची व गुरूग्रंथ साहेब यांची आरती करून पूजन करण्यात आले. या शोभा यात्रेचे आयोजन नांदेड हुजूर साहेब गुरुद्वारा व सर्व शिख समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले.