*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१७.शहरातील गुरुद्वारा येथे डॉ.विजय सतबीर सिंघ प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड येथे साहिव श्री गुरु गोबिंदp सिंघ जी महाराज यांच्या प्रकाश गुरुपुरव निमित्त आयोजित ‘विशेष किर्तन दरबार’ मध्ये आपले विचार मांडतांना संबोधिले की गुरु महाराजांचे जीवन व त्यांनी दिलेली शिकवण जगातील लोकांमध्ये बंधूभाव व समानता राखण्यासाठी पुरक ठरेल देश-परदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरुद्वारा प्रशासनातर्फे महाराजा रणजीत सिंघ जी यात्री निवास कंपाऊंड मध्ये सर्व सोयी सुविधा युक्त नविन भक्त निवास ची उभारणी केली जाणार आहे ज्याचे काम प्रगती पथावर आहे. येणाऱ्या भाविकांसाठी गुरुद्वारा बोडां तर्फे 24 तास लंगर प्रसादची सेवा करण्यात येते. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे फ्री-बस सेवा रेल्वे स्टेशन ते गुरुद्वारा साहिब पर्यंत करण्यात आलेली आहे.
यावेळी त्यांनी सांगीतले की दिल्ली, श्री अमृतसर साहिब,चंदीगड, मुंबई,हैद्राबाद ई.ठिकाणांहून विमान सेवा येत्या काही दिवसांत त्यांची सुरुवात होणार आहे. गुरुद्वारा सचखंड बोर्ड तर्फे संचलित दशमेश हॉस्पीटल मध्ये ओ.पी.डी.सोबतच डायलेसीस चे उपक्रम यशस्वीरीत्या चालू आहेत पुढील काळात ह्या सोयी सुविधा अधीक वाढविण्याच्या दृष्टीने बोर्डाची वाटचाल सुरु आहे.
पुढे डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी सांगितले की, संस्थेचे ध्येय फक्त मानवतेची सेवा करणे हेच आहे आणि या सेवांचा लाभ सर्व जनतेने घ्यावा. यावेळी प्रशासक साहेबांनी उपस्थितांना गुरु गोविंद सिंघ जी महाराज यांच्या 357 व्या प्रकाशपर्वा निमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी स्थानिक तसेच शिख नवयुवकांनी आय.ए.एस., आय.पी.एस. सारखे उच्च पदांवर आपली उपस्थिती नोंदवावी व देशाची तसेच पंथाची सेवा करावी असे मनोगत व्यक्त केले यासाठी योग्य असे मार्गदर्शन व गरजू विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस ची व्यवस्था केलेली आहे.
या किर्तन दरवार वेळी तख्त सचखंड साहिब चे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघ जी- जत्थेदार साहिब तसेच सर्व पंजप्यारे साहिबान, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. ठाण सिंघ बुंगई तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते.
या विशेष किर्तन दरबार चे आयोजन स. दर्शन सिंघ जी लुथरा परिवार, माता विपनप्रीत कौर जी व गुरुद्वारा बोर्डाच्या सहकार्याने करण्यात आले. या विशेष किर्तन दरवार मध्ये रागी भाई तेजिंदर सिंघ जी जिंदू नानकसर कलेरावाले, भाई बलप्रीत सिंघ जी लुधीआणा, भाई राजिंदरपाल सिंघ जी, माता विपनप्रीत कौर जी सरप्रस्त बाबा कुंदन सिंघ जी भलाई ट्रस्ट चे किर्तनी जत्था, 108 संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी टकसाल चे विद्यार्थी तसेच हजूरी रागी तख्त सचखंड साहिब, नांदेड चे भाई सुरेश सिंघ जी यांनी मनोहर वाणी (किर्तन) करुन लोकांना तृप्त केले.
आज दि. 17 जानेवारी 2024 रोजी परंपरागत पध्दतीने श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या प्रकाश पर्वा निमित्त सायंकाळी 04:00 वाजता निशान साहिब, गुरु महाराज चे सोने व चांदी चे काठी चे घोडे,किर्तनी जत्थे, गतका पार्टी,खालसा हाईस्कुल चे शाळकरी विद्यार्थी तर्फे लेझीम व रिवीन चे देखावे बैंड-बाजा सोबत सादर करण्यात आले.हे नगर किर्तन शहरातील मुख्य मार्गानी भ्रमण करुन रात्री 10:00 वाजता गुरुद्वारा गेट नं. 1 (दर्शन देवडी) येथे समापन करण्यात आले. यावेळी डॉ.स.विजय सतवीर सिंघ प्रशासक,स.ठाण सिंघ बुंगई अधिक्षक,स.हरजीत सिंघ कड़ेवाले सहा अधिक्षक,स. रविंद्र सिंघ कपुर-सहा अधिक्षक,स.बलविंदर सिंघ फौजी सहा.अधिक्षक,स. ठाकुर सिंघ बुंगई-सहा. अधिक्षक,स.हरपाल सिंघ शिलेदार सी.एस.ओ.तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी या सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी आपले कर्तव्य बजावले.अधिक्षक गुरुद्वारा यांनी सांगितले आहेत.