KINWATTODAYSNEWS

गुप्त माहिती वरुन नियतक्षेत्र भुलजा कक्ष क्र. २१४B मधी सागी मालाचे तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मध्यरात्री धाड मुद्देमाल जप्त;तस्कर पसार

आज दिनांक 17/01/2024 रोजी मध्यरात्री वेळ 1 ते 2 वाजेच्या दरम्यान मा. श्री.केशवजी वाबळे साहेब ,उपवनसंरक्षक, नांदेड व मा. श्री.गणेशजी गिरी साहेब ,सहाय्यक वनसंरक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. सी. जी. पोतुलवार साहेब ,वनपरिक्षेत्र अधिकारी, बोधडी प्रा. यांच्या नेतृत्वात गुप्त माहिती वरुन नियतक्षेत्र भुलजा कक्ष क्र. २१४B मधील जंगल भागामध्ये वनतस्कर सागी मालाचे तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मध्यरात्री श्री. पोतुलवार साहेब व. प. अ. बोधडी यांनी नियोजनबद्ध सापळा रचून सर्व वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ३ ग्रुप मध्ये विभागून योग्य त्या सूचना देऊन नियतक्षेत्र भुलजा मध्ये दबा धरुन बसण्याच्या सूचना दिल्या व दुसऱ्या ग्रुपला सोमेश्वर महादेव मंदिर

मदनापुर येथे बसण्याच्या सूचना दिल्या आणि तिसऱ्या ग्रुप चे स्वतः नेतृत्व करून गुप्त माहिती मिळाल्या नुसार संबंधित वन तस्कर हे जंगल भागातून सागी नग काढून अशोक लिलँड कंपनीचा ( DJ DOST) या चार चाकी गाडी मधून सागी माल भरून निघताच तिचा पाठलाग करून सर्व वन कर्मचाऱ्यांनी सोमेश्वर महादेव मंदिर मदानापुर येथे गाडी अडविली असता अंधाराचा फायदा घेऊन चालू गाडी वन कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडून वन तस्कर गाडीतून उडी मारून जंगलाच्या दिशेने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, सदर कार्यवाहीत अशोक लीलँड ( DJ DOST) वाहन क्र. AP28 TE 8313 (अंदाजित किंमत रु. 150,000) व सागी नग 17 (त्यांचे घ. मी. -1.521 किंमत – रु.32093) जप्त करण्यात आले. सदर कार्यवाहीत वनपाल बोधडी जी. पी. नीलपत्रेवार, वनपाल थारा के. एम. बडूरे, वनपाल पाटोदा एस. एल. ढगे आणि वनरक्षक भुलजा जी. एस. देवकांबळे , डी. एन. गड्डे , के. जी. माळी, एन. पी. कोरडे, एस. आर्. वट्टमवार, पी. डी. दांडगे, ए. एन. रंगे आणि इतर वन कर्मचारी मिळून कार्यवाही करण्यात आली.

611 Views
बातमी शेअर करा