किनवट –
तालुक्यातील चंद्रपुर येथे श्री राम मुर्ती स्थापना मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातुन वाजत गाजत शोभायात्रा काढुन अक्षता वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
हिंदु धर्माचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा मंदिर उद्घाटनाची प्रतिक्षा आता संपत आली आहे, या पार्श्वभुमीवर अयोध्येतुन आलेल्या अक्षता घरा घरा पर्यंत पोहचवण्यासाठी रामभक्त एकवटले आहेत, अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात प्रभु श्री रामाच्या तैलचित्रासह शोभायात्रा काढण्यात आली होती, ह्या शोभायात्रेची सुरवात श्री.गुरूसाहेब(गुरुद्वारा) येथुन करुन सम्पूर्ण गावात प्रदक्षिणा घालुन शेवटी गावातील हनुमान मंदीर येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यात महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेवुन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. अबाल वृध्दांच्या घोषणांनी गाव भक्तीमय झाले होते. यावेळी दिग्रस चंद्रपूर ग्रामपंचायत येथील उपसरपंच कर्तार साबळे, गुरु साहेब, पोलीस पाटील जगणसिंग साबळे, ओमकार, अंकुश साबळे, संतोस ब्रधावल, सुभास, समस्त गावकरी उपस्थित होते.