*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.११.जिल्यातील नायगाव शहरालगत असलेली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील धक्कादायक घटना असून सदर घटनेत या निवासी शाळेतील मुलांनी जेवणाविषयी तक्रार केल्यामुळे बंदुकीचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लोखंडी फळ्याच्या साह्याने मारहाण करून येथील शिक्षकाला धमकवल्याची माहिती मिळाली आहे. आणि विद्यार्थ्यांना व निवासी कर्मचाऱ्यांना अर्वाचे भाषेत शिवीगाळ करून तेथील चिमुकल्यांना आई बहिणीवर वाईट शब्दाचा प्रयोग करून शिवीगाळ केला आहे. सदर शासकीय वस्तीगृहाचा भोजनपुरवठा कंत्राटदार रवी राजू भोकरे यांच्याकडे असून त्यांनी विद्यार्थ्यांवर वारंवार दमदाटी करत आहेत यात काही वस्तू विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने त्यांची तक्रार केल्याने कंत्राटदार ते कुठल्याच मागचा पुढचा विचार न करता विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याची वारंवार बाब पुढे आली आहे.
सदर घटनेतील गुंड कंत्राटदार रवी भोकरे व त्यांच्या साथीदारांनी विद्यार्थ्यांना मारहाणी ची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवणे ऐवजी विद्यार्थी व पालकांनाच पोलीस ठाण्यात नेत कारवाईचा फार्स केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनातील निवासी शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याची तक्रार केल्याने ठेकेदाराने चक्क येतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकाला बंदुकीची धमकी देत अर्वाचे भाषेत शिवीगाळ करीत आहे. आणि थेट विद्यार्थ्यांना मारहाण करून शिक्षकाला धमकी दिल्याची माहिती पुढे येत आहे.
सदर घटना रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली असून यात काही विद्यार्थ्यांची नावे घेऊन ये रे म्हणत्यात धाकावर अर्वाची भाषेत वेगळा व अनेकांना मारहाण करून शासकीय निवासी शाळेत गुंडांचा हैदोस माजल्याने येथील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केली असता तेथील लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली विद्यार्थ्यांनी हिम्मत दाखवत एकजुटीने कंत्राटदार व त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांना कोंडून ठेवले पोलिसांनी कंत्राटदार व गुंडावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिले ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तरी देखील पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला नव्हता 7 जानेवारीच्या रात्रीच्या वेळी संबंधित कंत्राटदार म्हणून घेणाऱ्या रवी भोकरे यांनी काही तरुणांना सोबत घेऊन तेथे गुंडगिरी सुरू केली.मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून नायगाव बाजार येथे तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाची विद्यार्थ्यांसाठी सहावी ते दहावी पर्यंत 177 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या निवासी शाळा आहे त्यामुळे या भागातील अनेक विद्यार्थी येथे वास्तव्यास राहून शिक्षण घेतात तेथे विद्यार्थ्यांना मिळणारा अल्प आहार जेवण फळे व इतर पुरवठा करण्याची जबाबदारी ब्रिक्स कंपनीला देण्यात आली आहे.मात्र अनेकदा तक्रारी करून देखील जेवणात व नाश्त्यात कुठलाच बदल झालेला नाही तरी या विभागातील अधिकाऱ्यांची आर्थिक लांगेभांगे यात कायम असल्याने पुन्हा एकदा हा प्रकार वाढीला होता.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या पालकासहस्थानिक व वरिष्ठ प्रशासनाला माहिती अवगत करून दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने आपल्या कर्तव्यात सुधारणा करणे गरजेचे असताना सुरक्षारक्षकालाच ढकलून देऊन वस्तीगृहात प्रवेश करत चार ते पाच जणांनी हे दोष घातला होता.वस्तीग्रात प्रवेश करून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून व शिक्षकाला धमकावून बंदुकीचा धाक देऊन यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर घटनेमुळे शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी व पालकांनी संबंधित प्रशासनाकडे गुंड रवी भोकरे यांचे त्वरित काम बंद करण्यात यावे व त्यांच्यावर झालेल्या घटनेची विषयी गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी देखील आता करण्यात आली आहे.
ही मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत असताना याबाबतची सविस्तर माहिती व अहवाल तयार करून यावर एक समिती नेमण्यात येईल व कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मीनगिरे साहेब यांनी दिली आहे.तर पुढील तपास करून यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे आणि तशा पद्धतीची संबंधित अधिकाऱ्याकडून पालकांना लेखी देखील देण्यात आली आहे.