किनवट = (तालुका प्रतिनिधी) गत अनेक वर्षापासून सांस्कृतिक, संगीत क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य असलेले सर्व परिचित व भाजपा निष्ठावंत म्हणून ओळख असलेले पत्रकार अनिल भंडारे यांची पक्षनिष्ठा व सदर क्षेत्रात मोठा वाटा आहे. याची दखल घेत भाजपा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लावली आहे. सदर नियुक्तीपत्र आमदार भीमराव केराम यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी सदर क्षेत्रात काम करत असताना पक्षनिष्ठा, पक्षाचे विचार, ध्येय धोरणासी बांधिलकी ठेवून पक्ष वाढीसाठी काम करीत राहणार असे मत भंडारे यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी आल्लेवार, भाजपा नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष संतोष चनमनवार, माजी नगरसेवक शिवा आंधळे, बालाजी धोत्रे सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे वरिष्ठ नेते राघू मामा, साप्ताहिक वंजारी पुकारचे मुख्य संपादक दत्ता जायभाये, मधुकर अन्नेलवार तसेच सर्व पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून अनिल भंडारे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल भंडारे यांची निवड
96 Views