KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा पत्रकार दिन संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाने महाराष्ट्रभर साजरा

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा पत्रकार दिन संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाने महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूरच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त रस्त्यालगत व मंदिरासमोर बसणाऱ्या १०१ गरिबांना उबदार ब्लॅंकेटस् चे वाटप करण्यात आले. त्यानंतर माहिती कार्यालय येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ सुधाताई कांबळे, जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, नितीन चाळक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुक्याच्या वतीने कार्यालय जागेच्या फलकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघाकडून प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकारांना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदीवे, तालुकाध्यक्ष निलय झोडे, शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, सचिव शेखर ईसापुरे, विर्शी प्रमुख दूर्गेश राऊत, सदस्य यशवंत कापगते, चेतक हत्तीमारे यांनी केले होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण भागातील पत्रकार व नागरिकांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी अनेक पत्रकार व नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर भावनाथ, जितेंद्र साठे, पत्रकार राहुल दोंदे पत्रकार बाळासाहेब चारस्कर, रविंद्र साठे, आरोग्य सल्लागार, आहार तज्ञ भगवान बाबा सोनवणे, अनिल आव्हाड सर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा सचिव प्रमोद राऊत, टेंभुर्णी उपाध्यक्ष गणेश घाडगे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय जगताप, गोविंद वृद्धाश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी देवणी शहराचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी तर अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी प्रा.रेवण मळभागे, ज्येष्ठ पत्रकार महेश कंजे, हसन मोमीन, शकील मनियार, आनंद अंकुलगे, आश्विन लांडगे, बालाजी कवठाळे, शादुल बौडीवाले, लक्ष्मण रणदिवे, प्रमोद लासुणे, सागीर मोमीन, राहुल बालुरे, कृष्णा पिंजरे , भैय्यासाहेब देवणीकर आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जळकोटच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जळकोट तालुकाध्यक्ष माधव होणराव, तालुका उपाध्यक्ष नामदेव केंद्रे, मारोती फुलारी, संगणक ऑपरेटर संभाजी फुलारी, तरूण उद्योजक कुणाल देशमुख, उध्दव होणराव, प्रहार दिव्यांग संघटनेचे वांजरवाङा शाखाध्यक्ष जनार्दन घुळे आदी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्ष प्रेम कुमार भारती, उपाध्यक्ष अशोक गायकवाड व सचिवपदी विवेक जळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे व विदर्भ अध्यक्ष केशव सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हादगाव तालुक्याच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी प्रा. राजेश राऊत, राजेश मामीडवार, संदीप तुपकरी, शिवाजी जोजार, अभिजित देवसरकर, अरविंद भोरे, संजय तोष्णीवाल आदी पत्रकार उपस्थित होते
किनवट प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे वतीने किनवट तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मराठवाडा संपर्कप्रमुख- आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष- नसीर तगाले, तालुका कार्याध्यक्ष- सय्यद नदीम, तालुका सचिव- राजेश पाटील, तालुका युवा उपाध्यक्ष विशाल गिमेकार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

129 Views
बातमी शेअर करा