KINWATTODAYSNEWS

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटी नांदेड युनिटच्या किनवट विधानसभेमध्ये संघटन समीक्षा बैठक किनवट येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये संपन्न.

किनवट : बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटी नांदेड युनिटच्या किनवट विधानसभेमध्ये संघटन समीक्षा बैठक किनवट येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये पार पडली.

या बैठकीला बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक मा. नितीन सिंग साहेब. महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा नांदेड औरंगाबाद झोनचे मुख्य प्रभारी आयु मनीष भाऊ कावळे साहेब. बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड. परमेश्वर गोणारे साहेब. महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. सिद्धार्थ टाकनखार साहेब. प्रदेश सचिव डॉ आनंद भालेराव साहेब.नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे जी.
शेरे साहेब. दीपक ओमकार.विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील, युवराज रिंगणमोडे. कोळी महादेव भाईचारा चे.गजानन सोमेवाड. शीख भाईचाराचे अध्यक्ष पाखरशिंग शोखी साहेब ,महिला युनिट. सौ पाटील ताई, भालेराव ताई. इत्यादी सेक्टर बूथ चे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. आनंद भालेराव प्रदेश सचिव यांच्या जन्मदिनी त्यांना मंगलमय शुभेच्छा देत मा. नितीन सिंग साहेब. मा. परमेश्वरजी गोणारे साहेब. मनीष भाऊ कावळे साहेब. प्रदेश सचिव सिद्धार्थ टाकणखार साहेब. जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम बोलत असताना मा. मनिषभाऊ कावळे.यांनी सांगितले की.बहुजन समाजातील किनवट विधानसभा मतदार संघ हा वेगवेगळ्या समाजातील लोकांचे वास्तव्य असलेला व डोंगरदऱ्यात वसलेला विधानसभा मतदारसंघ असून.या विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज एकत्र जोडण्याचे काम बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून एक मजबूत संघटन तयार करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे असे आवाहन केले. तर प्रदेशाध्यक्ष एड. गोणारे साहेब यांनी बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना माहामानावांचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रांन पनाने कार्य करण्याची गरज आहे. असे सांगितले व उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.

कारण डोंगराळ भागात विखुरलेला हा विधानसभा मतदारसंघ असतानाही. या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना या ठिकाणी येण्यासाठी तयार केले. यानंतर नितीन सिंग साहेबांनी बहुजन समाजातील तरुणांनी योगदान देण्याची गरज आहे. कारण आज देश सुरक्षित नाही. माणूस सुरक्षित नाही. माणसात माणूस ठेवला जात नाही. असे आव्हान करत बहुजन समाज पक्षाचा कारवा घडवण्याची विनंती केली.यावेळी संघटन समीक्षा घेतल्यानंतर समाधान कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून कार्यकर्त्याची सांगता करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव पाटील यांनी केले. तर कोळी भाईचार चे पदाधिकारी गजानन सोमेवाड यांनी आभार मांनले…

244 Views
बातमी शेअर करा