साकोलीत येथे प्रथमच पत्रकार दिनी “पत्रकार संघ जागा व फलकाचे लोकार्पण , पत्रकारांचाही सत्कार
साकोली- पत्रकार हा जनहितार्थ सेवेसाठी असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा भवन निर्माण कार्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवून शासकीय भूखंडावर शासनाने जागा उपलब्ध करावी आणि पत्रकार सेवा भवनाला अडथळा निर्माण झाल्यास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबई दालनापासून प्रशासकीय यंत्रणेत कार्य करीत जशास तसे उत्तर देईल असे प्रतिपादन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी साकोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजित जागा आणि फलकाचे लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
पुढे ते म्हणाले की पत्रकार कोणताही वैयक्तीक स्वार्थ न साधता जनतेच्या व शासकीय सेवेसाठी धडपडत असतो. त्यांना बातम्या संकलन व संपादन करण्यासाठी एक जागा आवश्यक असते आणि साकोलीत प्रथमच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी हे उल्लेखनीय कार्य करून दाखविले. स्थानिक प्रशासनाने या शासन मान्यताप्राप्त पत्रकार संघास पूर्ण सहकार्य करावे कारण अन्यत्र शासकीय जागेवर आज अनेक अवैध धंदे मांडून ती जागा सर्रासपणे विकली अथवा भाड्याने दिली जाते यावर शासनाचे दुर्लक्ष का.? नगरपरिषद परिषद प्रशासनाने पत्रकार संघाच्या नियोजित जागेच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण तात्काळ काढून ती जागा व जनहितार्थ पत्रकार शासन मान्यताप्राप्त संघास उपलब्ध करून द्यावी पत्रकार संघाला जागेसाठी धडपड करावी लागत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही संजीव भांबोरे म्हणाले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या साकोली पत्रकार भवन फलक लोकार्पण सोहळ्यात उदघाटक राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, अतिथी लाखांदूर तालुका पत्रकार अध्यक्ष प्रेमानंद हटवार नगरपरिषद माजी उपाध्यक्ष जगन उईके, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा लता द्रुगकर, शिवसेना शहर प्रमुख महेश पोगडे, भाजपा महामंत्री प्रदीप गोमासे, जिल्हा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष विवेक बैरागी, फ्रिडमचे किशोर बावणे, सुनील जगीया, शिवसेनेचे गजेंद्र लाडे, किशोर गडकरी आदी उपस्थित होते.
पत्रकार दिनानिमित्त पत्र पत्रकार संजीव भांबोरे, पत्रकार प्रेमानंद हटवार व पत्रकार डि. जी. रंगारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी संघाकडून चार प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकारांना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे, जिल्हा युवती अध्यक्ष रोहिणी रणदीवे, तालुकाध्यक्ष निलय झोडे, शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, सचिव शेखर ईसापुरे, विर्शी प्रमुख दूर्गेश राऊत, सदस्य यशवंत कापगते, चेतक हत्तीमारे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन रवी भोंगाने यांनी तर प्रास्ताविक डि. जी. रंगारी यांनी तर आभार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी मानले.