बोधडी प्रतिनिधी दि 06/01/2024
किनवट तालुक्यातील बोधडी बुद्रुक येथे भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रज्ञा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन महाप्रज्ञा बुद्ध विहार संस्थान बोधडी बुद्रुकच्या आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
किनवट तालुक्यातील बोधडी बुद्रुक येथील कालवश हिरामण केरबा कांबळे यांनी दान दिलेल्या जागेवर स्मृतिशेष भंते शासनदुत यांनी सदरील जागेचे नाव क्रांती टेकडी असे नामकरण करून तेथे एक विहार असावे असे मनोगत व्यक्त केले. त्यांची संकल्पना साकार करण्यासाठी स्मृतीशेष डी जी दवणे सर, स्मृतिषेश आर बी भालेराव सर, स्मृतिषेश जी के साळवे सर आणि त्यांच्या सर्व नवयुवक सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बुद्ध विहार उभारणीला वेग दिला. आणि आज रोजी एक भव्य वास्तू उभी राहिली या वास्तुत दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करून सदरील महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हा लोकार्पण सोहळा पुज्यनिय भिकू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या निमित्ताने दिनांक आठ रोजी सकाळी सात वाजता बौद्ध वाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून भव्य मिरवणूक निघेल. ही मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करीत सकाळी साडेनऊ वाजता महाप्रज्ञा बुद्ध विहारात पोहोचेल.
सकाळी ठीक दहा वाजता श्रद्धेय भिक्कु संघाद्वारे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व सामूहिक वंदना सूतपठण श्रद्धेय भिकू संघाद्वारे धम्मदेशना करण्यात येईल.
दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित त्यांचे भोजन. सायंकाळी सहा वाजता महाप्रज्ञा बुद्ध विहाराच्या निर्मितीत व विविध सामाजिक धार्मिक कार्यात ज्या ज्या मान्यवरांनी मोलाचे सहकार्य मार्गदर्शन केले योगदान दिले त्या मान्यवरांचा गौरव व सत्कार करण्यात येईल.
रात्री सात वाजता पासून सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रम यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील पूर्वार्ध उत्तरार्धाचे दर्शन घडवून देणारी नाटिका बाबा का जागले? का रडले? आणि भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे आणि संच औरंगाबाद यांचा बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न होईल. सर्व जनतेने या अभूतपूर्व सोहळ्यात उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महाप्रज्ञा बुद्ध विहार संस्थान बोधडी, भारतीय बौद्ध महासभा शाखा बोधडी रमा माता महिला मंडळ बोधडी व बौद्ध वाड्यातील व गावातील संपूर्ण युवक तमाम गावकरी मंडळी यांनी केले आहे.
बोधडी बुद्रुक येथे भव्य बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रज्ञा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार
295 Views