KINWATTODAYSNEWS

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भटक्या समाजाच्या स्त्रियांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करा…वंचित बहुजन आघाडी यांची मागणी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.४.(तुपा) जवाहर नगर येथे अनेक वर्षापासून भटका विमुक्त समाज पाल,झोपड्या टाकून राहत आहेत .
पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही समाजकंटकाकडून महिलांवर रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला त्यामुळे अन्याय ग्रस्थानी ग्रामीण पोलीस स्टेशन सिडको येथे रीतसर गुन्हा नोंदवला आहे.

महिला,लहान लेकरं,पुरुष बाहेरगावी कामासाठी बाहेर गावी गेल्यामुळे भयभीत झाल्या होत्या सन्माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याशी जिल्हाध्यक्ष पालमकर यांनी चर्चा करून,भटक्या समाजांच्या महिलावर रात्रीच्या वेळी हल्ला झाला,त्या समाजकंटकांना त्वरित अटक करून,सदरील वस्तीत पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज त्यांच्या थेट वस्तीत जाऊन त्यांच्याशी चर्चा करून,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या लोकांना धीर दिला.या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथील पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांनी भेट दिली.

त्यांनीही महिलांनी घाबरून जाऊ नये ,पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे.

अशाप्रकारे धीर दिला. वस्तीमध्ये त्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा पिण्याचे पाणी आपणाला व्यवस्थित मिळेल मूलभूत सुविधा बाबत कोणी त्रास दिल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन सिडको येथे आपण संपर्क साधावा असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर, कमलेश चौदंते,मुदखेड तालुका अध्यक्ष मोहन कांबळे, अमर हत्तीआंबिरे, भटक्या विमुक्त समाजाचे नेते देविदास हादवे आणि परभणी, हिंगोली, अमरावती येथून आलेले भटक्या विमुक्त विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

183 Views
बातमी शेअर करा