किनवट :-गोकुंदा येथील मथुरा व बंजारा समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष बसपा नेते प्रा. डॉ. आनंद भालेराव हे होते तर प्रमुख पाहुण्या आयुष्यमती सुनंदाताई पाटील हया होत्या,याप्रसंगी त्यांनी उपस्थिताना सावित्री माई यांच्या जीवन कार्यावर माहिती दिले, सावित्रीमाई यांनी वंचित, उपेक्षित व मागासवर्गीय लोकांना शिक्षण देवून मुख्य प्रवाहत आणले, त्या पहिल्या शिक्षिका,सामाजिक परिवर्तनाच्या शिलेदार ठरल्या, त्यांच्या विचाराने मार्ग कर्मन करून वाटचाल करावे, उच्च शिक्षित होऊन आपला उद्धार करावे असे विचार व्यक्त केले, सर्वांनी सावित्रीमाई च्या प्रतिमेस पुष्प हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले, संचलन आयु. अर्चनाताई येरवाल यांनी केले, आभार बादल तितरे यांनी मानले यावेळी विनय, आदर्श, राणी व सुमित येरवाळ यांनी विद्येची स्पुर्तीनायीका सावित्री माई च्या जीवन कार्यावर भाषण दिले, या कार्यक्रमास अभिनय राठोड सह अनेक बालक, बालिका उपस्थित होते, जय ज्योती, जय क्रांती च्या जय घोषणा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.
गोकुंदा येथील मथुरा व बंजारा समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांची 193 वी जयंती साजरी
179 Views