KINWATTODAYSNEWS

3रे जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन माहूरगड ;भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावरील परिसंवाद

किनवट /माहूर :-समता समानता समाजाची निर्मिती करण्यासाठी भारतीय लोकशाही समोरील संप्रदायीकता, प्रादेशिक वाद, हिंसा, भ्रष्टाचार, जाती विषमता, निरक्षरता, सामाजिक असमानता, आर्थिक विषमता, दहशतवाद, संघटित धर्मांधता, शिक्षण, आरोग्य व रोजगार या आव्हानाचा अभ्यास चिंतन करून, त्याचावरील उपायचा प्रचारातून जनतेला शिक्षण देवून करावे लागेल, त्यानंतरच संसदिय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतरित करून वाटचाल करावे असे मत प्रा. डॉ. आनंद भालेराव यांनी 3रे जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन माहूर गड “भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावरील परिसंवादात व्यक्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले कि, लोकशाहीचे प्रेरक तथागत बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू यांच्या व कार्याची प्रेरणा घेऊन भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले, समता, स्वातंत्र्य व बंधुता यावर आधारित तत्वाचे पालन करूनच सध्या स्तिथील आव्हानाला रोखू शकतो. अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र लोणे हे होते. सहभाग ऍड. विजय गोनारकर, बालाजी थोटवे यांनी घेतले व लोकशाही पुढील आव्हाने यावर भाष्य केले. संचलन जिल्हा अध्यक्ष रणजीत गोनारकर यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले, मंचावर संमेलन अध्यक्ष अनंत राऊत अकोला, स्वागत अध्यक्ष साईनाथ महाराज हे होते. संमेलननातं पुरुष, महिला व विध्यार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.

159 Views
बातमी शेअर करा