किनवट तालुका प्रतिनिधी ःकधीही क्षय न होणाऱ्या अक्षदा या आपल्या प्रभु रामचंद्रच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल अक्षदा आल्या असून प्रत्येक घराघरात जाऊन राम भक्तांना त्या अक्षदा सन्मानपूर्वक देण्यात याव्या हे रामाचे कार्य समजून अक्षदा वितरण करतांना स्वयंसेवकांनी या अक्षदा पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या आणि 22 जानेवारी रोजी प्रत्येकाने आपआपल्या घरात मंदिरात ज्ञानदीप असलेल्या दिवे लावून दीपोत्सव साजरा करून भजन कीर्तन आणि शंख ध्वनी घंटा नाद करावा असे आवाहन वेद मुर्ती दिनेश गुरूजी यांनी किनवट येथील श्री राम मंदिरात अक्षदा वितरण सोहळ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले . येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्या स्थित प्रभू श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्री राम मंदिर गर्भगृहात स्थापित करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आयोध्या येथून आलेल्या अक्षदा संपूर्ण किनवट जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहे या अक्षदा वितरित करण्यासाठी रामभक्ताकडे वेदमूर्ती दिनेश गुरुजी यांच्या हस्ते सुपुर्द केल्या. यावेळी बोलताना दिनेश गुरुजी पुढे म्हणाले श्रीराम भक्ताच्या त्याग ,तपस्या आणि बलिदानामुळेच अयोध्येतील श्री राम मंदिराची नवनिर्मित वास्तु निर्माण झाली आहे. त्यानिमित्त देशातील प्रत्येक राम भक्तांनी आयोध्येत या भव्य दिव्य सोहळ्याला येण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी अक्षदा घरोघरी देण्यात येणार आहेत. हे काम आपल्या रामाचे आहे प्रत्येकांना एकाच दिवशी आयोध्या येथे जाणे शक्य नसले तरी यथावकाश प्रत्येक रामभक्तांनीच अयोध्येला येण्यासाठी व श्री राम ललाचे दर्शन घेण्यासाठीच कधीही क्षय न होणाऱ्या अक्षदा देऊन निमंत्रण देण्यात येत. आहे 22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दीड या काळात रामभक्ताने एकत्रित येऊन श्रीरामाचे भजन कीर्तन एलसीडी स्क्रीन लावून टीव्ही लावून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे शंख ध्वनी घंटा नाद आरती करून प्रसादाचे वितरण करावे श्री राम रक्षा , हनुमान चालीसा सुंदर कांड पठण करावे आणि सायंकाळी दिव्याची रोशनी करून आंधारातुन प्रकाशाकडे जाण्यासाठी दिवाळी नंतरची दिवाळी साजरी करत दीपउत्सव साजरा करावा असे आवाहनही यावेळी दिनेश गुरुजी यांनी केले प्रारंभी विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध केंद्रे प्रास्पावीक केले रोहीत चाडावार यांनी अक्षदा वितरण कार्यक्रमाची माहिती दिली यांनीही या वेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , अजय चाडावार ,शिवा क्यातमवार , रमेशचंद्र संतोष रायेवार आशोक राउत,गंगाराम विशाल पांपटवार, आरपेल्लीवार,अॅड.दिलीप काळे,गौरव इटकेपल्लीवार संतोष मरस्कोल्हे चंद्रकांत नेम्मानीवार शुभम कोंकलवार,सुनिल पिसारीवार, साइ कोडपीटावार,सचीन सर उमा भंडारे,भंडारे ताइ सह राम भक्त उपस्थीत होते.
किनवट येथील श्री राम मंदिरात अक्षदा वितरण सोहळा
248 Views