KINWATTODAYSNEWS

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुकीत युवकांना संधी देऊ – माजी आमदार प्रदीप नाईक

किनवट प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मतभेदाचे राजकारण सुरू झाले विकास ऐवजी जाती धर्माचे मुद्दे पुढे करून समाजा समाजात विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे लोकशाही आणि देशातील सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी युवकांनीच आता जागृत होऊन पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट करत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुकीत युवकांना संधी देऊ अशी घोषणा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी किनवट येथील एन के गार्डन मध्ये राष्ट्रवादी युवक कार्यकारणी नियुक्ती सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गबा राठोड नांदेड जिल्हा बँकेचे माजी संचालक दिनकर दहिफळे माझी जि प सदस्य मधुकर राठोड माजीं जि प उपाध्यक्ष समाधान जाधव बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे माजी सभापती अनिल पाटील कराळे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी माजी नगराध्यक्ष साजिद खान माजी उपसरपंच प्रवीण मॅकलवार आदिवासी आघाडीचे जयवंत वानोळे इस्लापूर बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील शिवराम जाधव रामा उईके,माहूर बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते माजी नगराध्यक्ष अरुण आळणे माजी जि प सदस्य बंडू नाईक झहीर खान शेख सलीम गोकुंदाचे उपसरपंच शेख सरुबाई माजी उपसभापती श्रीराम कांदे बंटी जोंमदे संचालक अजित साबळे उपसरपंच राजू सुरोसे,नईम खान हसन लाला ताहीर भाई प्रकाश बोड्डेवाड,दत्ता कसबे मारुती रेकुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आ नाईक म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात जनतेचे हित आणि विकासात्मक मुद्द्यावरून मतभेदाचे राजकारण केले जात होते परंतु केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून विकास कामाऐवजी जाती धर्माच्या नावाने जाती जातीत आणि समाजा समाजात विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे. आगामी निवडणुकीत युवाशक्तीची ताकद महत्वपूर्ण ठरणार असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकांना संधी देईल अशी घोषणा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी केली. दिनकर दहिफळे दतराम मोहिते साजिद खान झहीर खान फिरोज दोसानी अरुण आळणे जयवंत वानोळे, जयपाल जाधव यांनी त्यांच्या भाषणातून सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करत सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सत्तेची संधी उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन उपस्थित युवकांना केले आहे.
प्रास्ताविक भाषणातून युवक काँग्रेसचे किनवट तालुका अध्यक्ष बालाजी बामणे यांनी युवकांच्या समस्या मांडल्या असून आगामी काळात युवकांची एक मोठी फळी तयार करून पुन्हा एकदा किनवट विधानसभेचा गड ताब्यात घेण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची किनवट शहर, गोकुंदा शहर तसेच इस्लापूर, मांडवी, मोहपुर उमरी जलधरा व बोधडी सर्कलची कार्यकारिणी जाहीर केले असून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सोळंके पाटील यांनी केले तर किनवट बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळू शेरे डॉ गंगासागर मनोज राठोड जब्बार भाई शेख अफरोज प्रेम जाधव इरपणवार सर गंगाधर बट्टलवाड,मनोज कीर्तने युसूफभाई नारायण शिनगारे नारायण नरवाडे गजानन मंदाळे अजय कोवे बाळू पाटील पवार महेश कणकावार प्रमोद मुनेश्वर बाळू शेळके भुरके सर, प्रबोध राठोड अमोल जाधव मनोज श्रीरामे साई तिरमनवार अमोल जाधव मुखराम शेख अजीम शेख प्रमोद मुनेश्वर संग्राम शेवाळे गोविंद दुर्वे गजानन शेळके जोतिबा गोणारकर,अंबाडीचे सरपंच गिरी जाधव अनेक गावातील सरपंच उपसरपंच संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा नेते गण व युवक मित्र मंडळ यांच्यासह किनवट तालुक्यातून 700 पेक्षा अधिक युवक उपस्थित होते.

342 Views
बातमी शेअर करा