नांदेड : शहरातील खऱ्या पूरग्रस्तांना दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर,नांदेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर आणि नांवाशमनपा येथे माकप आणि सीटूच्या वतीने मागील चार महिन्यापासून विविध आंदोलने झाली आहेत आणि अजूनही सुरूच आहेत.
आमदार खासदारांना निवेदने पाठविले आहेत परंतु काहीएक फायदा होणाची चिन्हे दिसत नाहीत.
शहरातील पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ माकपने दि.२० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा मुख्य कार्यालया समोर
तीव्र निदर्शने करून आयुक्त महेशकुमार डोईफोडे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदने दिली.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे म्हणून सीटू कामगार संघटनेने आतापर्यंत १५आंदोलने केली आहेत. दिनांक २६ डिसेंबर रोजी या आंदोलनास ७५ दिवस पूर्ण होत आहेत.
सहा हजार लोकांना अनुदान दिल्याची यादी मनपा आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली असून नाल्याच्या काठावर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आल्याच्या शकडो तक्रारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
त्रुटीची राहिलेली पूरग्रस्तांची यादी मात्र अजून महापालिकेने तयार केली नाही.
या विरोधात दि.१ जानेवारी पासून भाकप (माले)आणि राष्ट्रीय संविधान बचाव आंदोलनाच्या वतीने तहसील कार्यालय,नांदेड समोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचा इशारा कॉ. दिगंबर घायाळे आणि प्रा. देविदास इंगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनास दिला आहे.
अशी माहिती माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दिवाळीपूर्वी अनुदान आणि अन्न धान्य किट देण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सीटूच्या शिष्टमंडळास सांगून ३ नोव्हेंबर रोजी उपोषण सोडविले होते परंतु अद्याप पात्र पूरग्रस्तांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही.
मागील चार महिन्यापासून सुरु असलेल्या आंदोलनात कॉ.गंगाधर गायकवाड,
कॉ.मारोती केंद्रे,कॉ.सोनाजी कांबळे,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.प्रदीप सोनाळे,सुभाष कोठेकर,सय्यद फातेमा बी, ताहेराबी कुरेशी,खालेदा बी,अविनाश कांबळे,कॉ.मुमताज शेख,शेखअंजुम बेगम, शेख इसाक शेख नबीसाहब,रजिता श्रीनिवास,आदींजन करीत आहेत.