KINWATTODAYSNEWS

होटाळा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या 58.दिवसा नंतर साखळी उपोषणाला तात्पुरती स्थगित

*नायगाव तालुका प्रतिनिधी:चंद्रकांत पाटील*

*नायगाव*:दि.२५.मराठा योद्धा श्री मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण दिनांक 30/10/2023 पासुन चालू होते या साखळी उपोषणाला काल बीड येथे झालेल्या इशारासभेत श्री मनोज पाटील जरांगे यांनी दिलेला आदेश सकल मराठा समाजाला मान्य आहे या हेतूने 20 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जाण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येतील साखळी उपोषण सकल मराठा समाजाच्या वतीने तात्पुरते स्थगित करण्यात येत आहेत

तरी प्रशासनाने आजपर्यंत केलेले सहकार्य आणि गावकऱ्यांनी केलेले साखळी उपोषण हे शांततेत पार पडले असून येणाऱ्या काळात शासनाने सहकार्य करावे असे सकल मराठा समाज होटाळ्याच्या वतीने आज नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुठे साहेब व तहसील कार्यालय चे महसूल अधिकारी तलाठी बामणीकर साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 24/12/23 रोजी साखळी उपोषण साडेअकरा वाजता तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे उपस्थित सकल मराठा समाज नायगाव तालुक्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.सकल मराठा समाज होटाळा यांनी अशी माहिती दिली आहे.

433 Views
बातमी शेअर करा