KINWATTODAYSNEWS

अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसासह तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२३.जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 23/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की,माळटेकडी ब्रिजचे खाली,नांदेड येथे तिन इसम बसलेले असुन त्यांचेकडे अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस आहेत अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे 1) निकेश ऊर्फ बॉबी चंद्रमुनी हटकर वय 26 वर्ष रा. गंगाचाळ,नांदेड 2) कृष्णा राजेश स्वामी वय 18 वर्ष रा. गंगाचाळ नांदेड 3) संदीप अंकुश पवार वय 20 वर्ष रा. गोविंदनगर,नांदेड यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता,निकेश ऊर्फ बॉबी चंद्रमुनी हटकर याचे कमरेला एक अग्नीशस्त्र (गावठी कटा) व 02 जिवंत काडतुस व मोबाईल असा एकुण किंमती 69000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीतांविरुध्द पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. नमुद आरोपीतांना पोलीस ठाणे विमानतळ यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधीक्षक,नांदेड,मा.श्री.अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक,नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री उदय खंडेराय,पो.नि.स्थागूशा नांदेड, पोउपनि दत्तात्रय काळे,पोहेकॉ गंगाधर कदम,बालाजी तेलंग, पोना/संजिव जिंकलवाड, पोकॉ/ विलास कदम,गणेश धुमाळगजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, मोतीराम पवार,मपोहेकॉ हेमवती भोयर चालक शेख कलीम,हेमंत बिचकेवार स्थागुशा,नांदेड व सायबर सेलचे पोहेकॉ दिपक ओढणे,राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे.सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

159 Views
बातमी शेअर करा