KINWATTODAYSNEWS

जलजिवन मिशन अतर्गत ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या सर्वच बोगस

*कामाचे निरीक्षण करून दोषीवर कार्यवाही करून इस्टिमेंट प्रमाणे*
*वेळेत काम पुर्ण करावे*
*या साठी जिल्हा अधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांना* *अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी*

नांदेड प्रतिनिधी: जिल्हा अंतर्गत ग्रामिण भागामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातुन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल या योजनेच्या माध्यमातून करोड़ो रू्पयाचे विकास कामे केली जात आहेत, परंतु या विकास कामाच्या नावावर सर्वच प्रामपंचयात मध्ये या योजनेचे बोगस काम होतआहेत. जलजिवन योजनेअंतर्गत बोगस काम होत असल्याच्या नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी आहेत
परंतू संबधित प्रशासन विभागात भ्रष्ट्राचार केला जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीची कुठल्याच प्रकारे संबधित विभागाकडुन दखल घेतली जात नाही. ही अंत्यत गंभीर बाब आहे केंद्रसरकार व राज्यसरकार ग्रामिण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून देण्यासाठी जलजिवन योजना राबवली जात आहे. परंतू राजकिय राज्यकत्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित विभागाच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करून हा जनतेचा पैंसा लुटण्याचे काम सुरु आहे, त्यामुळे या योजनेच्या माध्यामातून होत असलेला करोडो रूपयाचा भ्रष्ट्राचार यावर आपण विशेष पथकामार्फत सक्षम आधिकारी यांना नेमून वेळोवेळी
निरीक्षण करून दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी आणि त्याचबरोबर योजनेच्या माध्यमातुन होत असलेले
कामाचे सर्वेक्षण करून सर्व कामे इस्टिमेट प्रमाणे वेळेत पुर्ण करून घ्यावेत ही नम्र विनंती मा. महोदय आपण समक्ष आधिकारी लोकसेवक या पदाचा वापर करून घ्यावेत ही नम्र विनंती खर्च करून राबविली जात असलेल्या या योजनेचा नागरिकांना लाभ मिळून दयावा आणि शासनाचा करोडो रूपये जनतेचा पैसा वाया जाणार नाही याची आपण सर्वतोपरी खबरदारी घ्याल हि आपेक्षा.
या योजने अंतर्गत खोदून ठेवलेले रस्ते हे पुर्णपणे व्यवस्थित बनवून नागरिकांना ये जा करण्यासाठी सुविधा पुरवावी. जर योग्य ती कार्यवाही न झाल्यास आ.भा. भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीन तीव्र अंदोलन व
उपोषण करण्यात येईल.
आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करावा हि विनंती.
ह्या वेळी संघटनेचे १.प्रदेश उपाध्यक्ष रामदास पाटील गिरे
२. शिवकुमार प्रदेश अध्यक्ष मी.से.३.हरजिंदर सिंघ संधू
प्रदेश कार्याध्यक्ष मी.से.४. गजानन पाटील गव्हाणे जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर५. बाबुराव क्षिरसागर तालुका अध्यक्ष अर्धापूर५. सोनाली ताई तालुका अध्यक्ष मुखेड.
आदी उपस्थित होते

120 Views
बातमी शेअर करा