*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२३.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २०२४ ब्लॅंकेट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून सतत पाचव्या वर्षी ४० मध्यरात्री फिरून रस्त्यावर कुडकुडत पडलेल्या बेघरांच्या अंगावर ” मायेची ऊब ” पांघरण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली.यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांची विशेष उपस्थिती होती.*
भाजपा महानगर नांदेड,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रात्री नगीनाघाट परिसरातून “मायेची ऊब” उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी लायंस सेंट्रल अध्यक्ष ॲड.उमेश मेगदे, सन्मीत्र फाउंडेशन अध्यक्ष डॉ.दि.बा.जोशी यांच्या हस्ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अरविन्द भारतीया, शिवप्रसाद राठी,व्यंकट मोकले,मोहनसिंग तौर,शीतल खांडिल,डॉ.सचिन उमरेकर,सुरेश लोट, राज यादव, रुपेंद्रसिंघ शाहू, रुपेश व्यास, कैलास महाराज वैष्णव,बाबा हरिसिंघ,ॲड.चिरंजीलाल दागडीया,संतोष कदम,नीता दागडिया,जयश्री ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. ब्लॅंकेट देणारे दानशूर नागरिक प्रमिला भालके,प्रा .प्रभाकर उदगीरे,द्वारकादास अग्रवाल,गिरधारी परमानी,निर्मला पाठक,रमेश मुत्तेपवार,शिवाजी शिंदे,सुधाकर पाठक,निर्मला अग्रवाल यांचा संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते शिरोपाव देऊन सन्मान करण्यात आला.आत्तापर्यंत ॲड.बी.एच.निरणे,ॲड.दिलीप ठाकूर,रुपेश वट्टमवार,स्नेहलता जायसवाल हैद्राबाद,विश्वजीत मारोती कदम,आशा शेळके, प्रमोद हिबारे,व्यास परिवार,प्रा. रमेशचंद्र जायसवाल,
रमेश सारडा,अशोक मजगे,जबडे सुधाकर,मोहित व रेणुका जयप्रकाश सोनी,राजू लापशेटवार,नंदिनी पुणेकर,
शोभा गुरुसिंग चौहान,पंकज अग्रवाल,सतीश सुगनचंदजी शर्मा,अविनाश चिंतावार,डॉ. अवधुत पवार,राहटीकर परिवार,डॉ.सचिन चांडोळकर माधव बोडके,राजेंद्रसिंह निजामबाद ,पं.पंकज कृष्ण शास्त्रीजी भागवतचार्य,सोनाली वारले,श्रीकांत पाटील,कवी युगराज जैन,प्रमोदसिंह कोलकात्ता,खुशबू रोहन मुत्तेपवार,डॉ.यशवंत चव्हाण, ओमप्रकाश पांपटवार,प्रा.रवी शामराज,उत्तरवार,ॲड.मनीष खांडील, अज्ञात दाते यांनी लोकसभागातून एकूण ११२० ब्लॅंकेट दिले आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी ९०४ ब्लॅंकेटची आवश्यकता आहे.वीस ब्लॅंकेटसाठी रुपये चार हजाराची मदत करणाऱ्या दानशूर नागरिकांची नावे ब्लॅंकेट वर छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार आहे.चाळीस दिवस दररोज सोशल मीडियाद्वारे पन्नास हजार लोकांपर्यंत माहिती देण्यात येणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.दि.बा.जोशी यांनी याप्रसंगी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवा लोट यांनी तर आभार कामाजी सरोदे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर,अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा,सुरेश निलावार,गणेश उंद्रे, संतोष भारती,सोमेश उंद्रे, सविता काबरा,रोहण यादव,गिरधर गोरटकर,कपिल यादव,नरसिंह द्रोपतीवार, नथूलाल यादव,बबन गायकवाड,शेख आवेश, फकीरचंद यादव,गणेश बिरकुले, कैलास बरंडवाल यांनी परिश्रम घेतले. कडाकाच्या थंडीत देखील नांदेड शहरात गेल्या पाच वर्षात दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारामुळे एकही बेघर थंडीमुळे मृत्यूमुखी पडल्या नसल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.