*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२१.जगामध्ये मानव जात ही सर्वश्रेष्ठ असून त्याला जीवनाचा अर्थ कळतो जीवनामध्ये बुद्धांनी दिलेल्या पंचशीलाचे व विज्ञानवादी बौद्ध धम्माच्या विचाराचे आचरण केल्यास मानव जातीचे कल्याण होते असे मत भिकूसंघाचे जिल्हाध्यक्ष तथा खुर गाव. नांदुसा येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र चे प्रमुख भंते पय्याबोधी थोरो यांनी सिडको येथील सम्राट निवास गृह प्रवेश निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये धम्मदेशना देताना केले
यावेळी पत्रकार गंगाधर गच्चे लॉर्ड बुद्धा टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे दैनिक बहुरंगी वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी भैय्यासाहेब गोडबोले अडवोकेट चावरे सर एडवोकेट चावरे मॅडम दैनिक सम्राट चे जिल्हा प्रतिनिधी संभाजी सोनकांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना भंतेजी म्हणाले कि या पृथ्वीतलावर मानव जात ही सर्वश्रेष्ठ असून मानव जातीला पंचशीलाचे पालन करून जीवन जगावे लागते ज्या मानवाने पंचशीलाचे आचरण आपल्या जीवनामध्ये केले त्या मानवाची प्रगती झाली आहे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी मानवाला वस्त्र निवाऱ्याची गरज आहे त्याप्रमाणे निवाराही सुंदर असावा असे मानवाची कल्पना असते जीवनामध्ये पंचशीलाचे पालन करून योग्य रीतीने जीवन जगल्यास मानवाची प्रगती होऊन सुंदर निवाऱ्याची निर्मिती ही त्याला करता येते अशीच या ठिकाणी कांबळे परिवाराने बुद्धांच्या विज्ञानवादी व पंचशीलाचे पालन केल्यामुळे आजही सम्राट निवास वास्तु ही त परिश्रमातून उभी राहिलेली आहे या वास्तूमध्ये सुख समाधी शांती लाभण्यासाठी बुद्धांच्या विचाराची गरज आहे असे त्यांनी यावेळी आपल्या धम्मदेशनामध्ये सांगितले यावेळी भिकूसंघ तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते सर्वप्रथम भंते यांच्या हस्ते रिबीन कापून ग्रहप्रवेश करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून धम्मदेशना देण्यात आले