KINWATTODAYSNEWS

कुशल कर्मानेच माणसाचे कल्याण होते…भन्ते बी.संघपाल

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.१७.मनुष्याने सातत्याने कुशल कर्म करत राहील्यास त्याचे निश्चितच कल्याण होते असे भन्ते बी. संघपालजी महाथेरो मुंबई यांनी संबोधी परिसर येथे धम्मदेसनेत सांगितले.

भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखेच्या वतीने श्रामणेर तथा बौद्धाचार्य प्रशिक्षणार्थी भिक्खू संघास सम्यक बुद्ध विहार समिती संबोधी परिसर यांच्या वतीने दिलेल्या भोजनाचा स्विकार केल्या नंतर उपस्थितांना धम्मदेसना देताना बी संघपालजी बोलत होते.दुःख सर्वत्र असून दुःखावर मात करण्यासाठी माणसाने अकुशल कर्माला जीवनात थारा न देता सतत,सतत कुशल कर्म करून त्याचा संचय केल्यास जीवनात दुःख नाहीसे हाऊन सुख प्राप्त करता येते.आपल्या जन्मदात्या माता पित्यांचा सन्माम सेवा केल्या शिवाय कल्याणाचे दरवाजे खुलत नसल्याचे सांगून संघ नेहमी माणसाच्या उत्कर्षाचा,कल्याणा चा उपदेश करतो म्हणून संघाच्या प्रति आदर्श भाव बाळगून संघाला शरण जान्याचे सांगितले. यावेळी भन्ते बोधीधम्मो,भन्ते महानाम (केंद्रिय शिक्षक ) विलास गवई,तालुका अध्यक्ष बाबुराव सोनकांबळे,शहर अध्यक्ष साहेबराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी संबोधी परिसरातील उपासक उपासिका यांनी श्रामणेर संघावर पुष्पवृष्टी करत संघाचे जंगी स्वागत करून भोजनदान दिले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर . के.कदम,डी.एम.
कदम,जे.डी.वाघमारे,विक्रम क्षिरसागर,उमाकांत एडके , गौतम कावळे गोविंद थोरात , राष्ट्रपाल इंगोले,संजय जळपतराव,सतिश जाधव आदिनी परिश्रम घेतले .

119 Views
बातमी शेअर करा