KINWATTODAYSNEWS

बहारदार सादरीकरणाने ‘तेजोमयची’ राज्यस्तरीय छोटा ख्याल गीत गायन स्पर्धा व वसंत संगीत महोत्सव चकाकला

किनवट : राज्यस्तरीय छोटा ख्याल गीत गायन स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या संगीत उपासकांच्या बहारदार सादरीकरणाने ‘तेजोमयचा’ वसंत संगीत महोत्सव चकाकला.
         आदिवासी डोंगरी भागात संगीताचा प्रसार व्हावा या उदात्त हेतूने गुरुवर्य  स्मृतिशेष पंडित वसंतराव शिरभाते यांच्या 78 व्या जन्मदिना निमित्त तेजोमय प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने येथील गजानन महाराज संस्थान सभागृहात राज्यस्तरीय छोटा ख्याल गीत गायन स्पर्धा व वसंत संगीत महोत्सव नुकताच आयोजित केला होता.

         अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान व प्रमुख अतिथी म्हणून  भाजपा नेते  डॉ. अशोक पाटील सूर्यवंशी, शारदा शिरभाते, रेणुकादेवी स्वरताल संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष पाटील, जयराम कंचर्लावार, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, भाजपा माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, डॉ. गिरीश पत्की, गजानन मंदीर संस्थानचे सचिव रमेश दारमवार, सामाजिक कार्यकर्ते शिवा आंधळे, शिवाजी पवार, सुभाष कालावार, डॉ. अशोक चिन्नावार, गजानन कोत्तावार आदी मान्यवर उपस्थित होते.

      राज्यभरातून सहभागी झालेल्या छोटा ख्याल गीत गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणून बी. एम. सूर्यवंशी व दत्तात्रय पांचाळ यांनी काम पाहिले. यास्पर्धेत प्रथम पारितोषिक अभिरूपा पैंजणे, द्वितीय कृष्णा देवकते, तृतीय रोहन कदम, उत्तेजनार्थ ऋचा चक्रावार, दीपाली चिरंगे, दिनेश घुगरे, राजश्री पुद्दलवाड, विशेष पारितोषिक निर्गुण सूर्यवंशी व कृष्णा लिंबेकर यांनी पटकाविले. मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके व जयराम कंचर्लावार यांनी सर्वांसाठी अन्नदान केले.
       स्वरराज राजेश ठाकरे व संतोष शिरभाते यांनी बडा ख्याल, छोटा  ख्याल, अभंग, गझल, भक्ती गीत गाऊन संगीत वसंत महोत्सवात गुलाबी थंडी असतांनाही रंगत आणली. दिपाली मुंडे व तेजोमय प्रतिष्ठानचे महासचिव ज्ञानेश्वर आहेरकर यांनी संचालन केले. तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामजी मुंडे यांनी आभार मानले.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार सुनिल मांजरे, प्राचार्य सुरेश पाटील, यमुना केंद्रे, सचिन जाधव, तेजोमयचे उपाध्यक्ष अनिता म्हेत्रे, सहसचिव दलित इंगोले, कोषाध्यक्ष किरण हुंडेकर, सदस्य काजल राऊत, सदस्य लक्ष्मण हैबते, बालाजी गुट्टे, हनुमंत गिते, व्यंकट आडे, साईनाथ, किरण कागणे आदिंनी परिश्रम घेतले.
  या अनोख्या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रज्ञाचक्षू संगीत उपासकांनी तेजोमय प्रतिष्ठान स्थापून राज्यभरातील प्रज्ञाचक्षूंसह सर्वच संगीत अभ्यासकांना ही नामी संधी उपलब्ध करून दिली होती. हे विशेष.

161 Views
बातमी शेअर करा