उमरखेड/प्रतिनिधी:आदिवासींचे नायक तंट्या मामा भिल्ल व सोमा डोमा उमरेयांच्या स्मृती दिनानिमित्ताने बिरसा क्रांती दल द्वारा आयोजितआदिवासी संघर्ष परिषद उमरखेड येथे पार पडली सर्वप्रथम या संघर्ष परिषदेला रॅली काढून सुरुवात करण्यात आली त्यानंतर ही रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती या प्रांगणामध्ये आल्यावर सर्व बिरसा क्रांती दल पदाधिकारी व बिरसा क्रांती दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले रॅलीचे रूपांतर हळूहळू सभेत झाले मोठ्या संख्येने सर्व नांदेड,यवतमाळ किनवट तालुक्यातून जिल्ह्यातून या परिषदेला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव उपस्थित होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दल राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी होते तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर होते व मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगराव काळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डी बी अंबुरे, महिला फोरम महाराष्ट्र राज्य अध्यक्षा गिरिजा उईके, राज्य प्रशिक्षक बी व्ही एफ नारायणराव पिलवंड, राज्य महासचिव किरण कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते या आदिवासी संघर्ष परिषदेच्या व्यासपीठावरनं बिरसा क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आता आदिवासी समाज जागरूक होत असून त्याला आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव होत आहे त्यामुळे समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी लवकरच राजकीय पक्ष स्थापन होणार असून यातून समाजाच्या समस्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी घोषणा यावेळी त्यांनी व्यासपीठावरनं केली आदिवासी संघर्ष परिषदेचा मुख्य उद्देश कधी नव्हे तेवढे या काळात आदिवासी समुदायांनी आपल्या आत्मस्मानासाठी अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे अनेक बाजूंनी आदिवासींच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे काही दृश्य आहेत तर काही षडयंत्र अदृश्य आहेत जर ही सनातनी षडयंत्र यशस्वी झाली तर आदिवासी समुदाय येणाऱ्या काळात आपला सन्मान गमावून गुलामीच्या पथावर अग्रेषित होईल अशी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे म्हणून या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आदिवासींचे नायक तंट्या मामा भिल्ल व सोमा डोमा उमरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने बिरसा क्रांती दल द्वारा आयोजित आदिवासी संघर्ष परिषद उमरखेड या ठिकाणी पत्रकारांच्या उपस्थितीत ही आदिवासी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली यावेळी सर्व बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी बिरसा क्रांती दल कर्मचारी संघटनेचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश कोवे, बिरसा क्रांती दल संघटनेचे नांदेड ग्रामीण जिल्हाअध्यक्ष जितेंद्र अ . कुलसंगे, बिरसा क्रांती दल नांदेड ग्रामीण जिल्हा मीडिया प्रमुख प्रणय कोवे ,बिरसा क्रांती दल मांडवी सर्कल अध्यक्ष मोहन कन्नाके, बिरसा क्रांती दल विधानसभा प्रभारी संतोष कन्नाके, व उमरखेड येथील संपूर्ण पदाधिकारी आयोजक या सर्वांच्या उपस्थितीत आदिवासी संघर्ष परिषद पार पडली.
आदिवासी समाजांनी आपली राजकीय शक्ती दाखवण्याची वेळ आली दशरथ मडावी आदिवासी संघर्ष परिषद उमरखेड येथे संपन्न
87 Views