*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.६.माता रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे व महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासह इतर मागास आर्थिक विकास महामंडळाना भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथlराव शिंदे यांच्याकडे केली असून हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी राजेश कवळे व मुख्यमंत्री यांचे खाजगी सहाय्यक देवराम पळसकर यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी आ.बालाजीराव कल्याणकर हे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात माता रमाई घरकुल आवास योजनेचे लाभार्थी मोठया प्रमाणात असून त्या लाभार्थ्यांना मिळणारे अडीच लाख अनुदान हे घर बांधण्यासाठी अपुरे पडत असून आजघडीला महागाई वाढली असून घर बांधकामासाठी लागणारे साहित्याचे दर वाढले असल्याने लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान वाढवून पाच लाख रुपये करण्यात यावे.व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ व इतर मागासवर्ग महामंडळाना मिळणारे अनुदान वाढवून या महामंडळासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी राजेश कवळे, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सहाय्यक देवराम पळसकर यांनी उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली.या प्रसंगी जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर,मागासवर्गीय विभाग बिलोली तालुकाप्रमुख महेंद्र गायकवाड,माजी शहरप्रमुख शक्तीसिंह ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.