किनवट/प्रतिनिधी: किनवट पोलीस स्टेशन येथे दिनांक 28 11 2023 रोजी अकस्मात मृत्यू क्रमांक 45/ 2023 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल झाला होता. सदर अकस्मात मधील मधील एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 ते 50 वर्षे हा धानोरा ते बोधडी बुद्रुक चे दरम्यानच्या रेल्वे लाईन दरम्यान नंदिग्राम एक्सप्रेस च्या खाली येऊन चेंदामेंदा होऊन मरण पावला होता. सदर अकस्मात मृत्यूची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक सावंत पोलीस स्टेशन किनवट हे करीत आहे .
सदर अनोळखी अकस्मात मृत्यू मधील मयत याचा चेहरा पूर्ण चेंदामेंदा झाला होता.. मैताची ओळख पटवण्याचा कशावशीने प्रयत्न चालू असताना त्याचे शर्ट वरील टेलर मार्क वरून आदिलाबाद येथे जाऊन टेलर चा शोध घेऊन त्याचे मदतीने मयत याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव के.श्रीनिवास राहणार निजामाबाद राज्य तेलंगणा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उपनिरीक्षक सावंत पोलीस हवालदार वाडगुरे पोलीस शिपाई वानखेडे यांनी केली आहे
28 रोजी बोधडी-धानोरा दरम्यान नंदीग्राम रेल्वेखाली चेंगरुन मरण पावलेल्या इसमाची ओळख पटली. के.श्रीनिवास राहणार निजामाबाद राज्य तेलंगणा असल्याचे निष्पन्न
464 Views