KINWATTODAYSNEWS

रावणगांव येथील लेढीधरणावर सुरु असलेले साखळी उपोषणाचा प्रश्न चिघळला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.१. पुर्ण मावेजा देऊन बारागावाचे पुनर्वसन करूनच धरणाचे काम सुरू करा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी लेढीधरण बुडित क्षेत्रातील बारा गावातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लेढीधरणावर दिनांक २०/११/२०२३ नोव्हेंबर पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.साखळी उपोषणाचा ११दिवस असुन अनुक्रमाने रावणगावचा दिवस आहे. दोनशेच्या वर साखळी उपोषणकर्ते उपस्थित होते.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत.तोपर्यंत साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा लढा चालूच राहणार असल्याचे लेढीधरण संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील रावणगांवकर यांनी आज मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव गोणेगांव येथील मागिल ३९वर्षापासून पुर्ण होत असलेले लेढीधरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या,मावेजा,पुनर्वसन,लग्न न झालेल्या मुलाचे प्रश्न शासनाच्या आधीन आहे,यासह भौतिक सोयीसुविधासाठच्या प्रश्नासाठी रखडलेला आहे. सदर प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सरकारचे वेगाने हालचाली सुरू केले आहेत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त लाभार्थी आपल्या विविध मागण्यासाठी लेढीधरणावरच साखळी उपोषण सुरू केले आहे. १९८४ साली रावणगाव गोणेगांव येथील लेढीनदीवर लेढी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.

या धरणामध्ये गेलल्या गावाची १)रावणगाव,२)भाटापुर, ३) हासनाळ,४)कोळनूर,५)भिगोली, ६) भेंडेगाव ७) खु भेंडेगाव,८) भारजवाडी,९)भासवाडी,१०) इटग्याळ,११) मुक्रामाबाद,१२)वळकी,प्र.मु.या बाधित बारा गावातील प्रकल्पग्रस्तांची शेती व घरे अतिशय अल्पदरात काडून घेऊन त्याना उघडयावर सोडून दिल्याची प्रकल्पग्रस्ताच्या भावन व्यक्त करीत आहेत.आमच्या आताच्या भाव प्रमाणे एक हेक्टरी ३०००००० तिन कोटी प्रमाणे मावेजा देण्यात यावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे.गेल्या ३९ वर्षापासून प्रकल्पग्रस्ताचे मावेजा, पुनर्वसनाचा, लग्न न झालेल्या मुलाचे प्रश्न सुटलेला नसतानाही सरकारकडून धरणपुर्ण करण्यासाठी हालचाली वाडविल्या आसल्यामुळे बारा गावातील प्रकल्पग्रस्तांकडुन धरणाच्या कामाला जोरदार विरोध होत असलेल्या चा दिसून येत आहे.आसून आगोदर, शेती,घराचे,मावेजा,पुनर्वसन, मंगच धरण या २००६च्या शासकीय नियमाप्रमाणे सर्व बारा गावाचे भौतिक सुविधासह पुनर्वसनाचे काम पुर्ण करा. मावेजा देने होत नसेल तर आमचा सातबारा परत करा असे जनतेची मागणी जोर धरत आहे.

धरणग्रस्त बारा गावातील सर्व सुशिक्षित बेरोजगार प्रत्येकी ३५००००० पस्तीस लाख रुपयांची मागणी तरूणाच्या तोंडा चे शब्द आहेत.संपादीत २हजार ३३१ हेक्टर जमीनस
२०१३ कायदा लागू करण्यात यावे भूखंड नसतील त्याठिकाणी सरसकट
स्वेच्छा पुनर्वसन लागू करण्यात यावे.१८वर्षावरील मुला -मुलीना वाडिव कुटुंबात समाविष्ट करून घेण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी बुडित क्षेत्रातील बारा गावाच्या प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे.

रावणगाव गोणेगांव येथील लेढीधरणावरच साखळी उपोषण सुरू केले आहे. लेढीधरणावरील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी लेढीधरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संघर्षमय लढा सुरूच राहणार आसल्याची भुमिका घेतली आहे. या वेळी साखळी उपोषणात उपस्थित होते.

संघर्ष समिती चे अध्यक्ष राजू पाटील रावणगांवकर, बाळासाहेब रावणगांवकर, सरपंच सै ललिता अशोकराव रावणगांवकर,अशोक रावणगांवकर,कुलकर्णी,बाबू अप्पा नुच्चे,शादूल पाटील, मसरुदिन पटेल, जैनुद्दीन पटेल, किशन रावणगांवकर, नारायण येरावार,तंटामुक्ती चे अध्यक्ष भाटापुरकर,सुरेश पाटील भाटापुरकर,श्रीकांत थोटवे, श्रीवास्तव,प्रकाश श्रीवास्तव,श्रीनिवास गुरुचरण, अशोक तिपणे,जेबर पटेल,रामभाऊ देशमुख, अमित रामराव रावणगांवकर, जाकिर पटेल रावणगांवकर,दिनेश पाटील इटग्याळकर,आवडके अप्पा मुक्रामबाद, रावणगावातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

238 Views
बातमी शेअर करा