*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२४.पुर्ण मावेजा देऊन बारागावाचे पुनर्वसन करूनच धरणाचे काम सुरू करा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी लेढीधरण बुडित क्षेत्रातील बारा गावातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी लेढीधरणावर दिनांक २०/११/२०२३ नोव्हेंबर पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत.
तोपर्यंत साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा लढा चालूच राहणार असल्याचे लेढीधरण संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील रावणगांवकर यांनी सांगितले आहे. मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव गोणेगांव येथील मागिल ३९वर्षापासून पुर्ण होत असलेले लेढीधरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या,मावेजा,पुनर्वसन,लग्न न झालेल्या मुलाचे शासनाच्या आधीन आहे, यासह भौतिक सोयीसुविधासाठच्या प्रश्नासाठी रखडलेला आहे.
सदर प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सरकारचे वेगाने हालचाली सुरू केले असल्यामुळे प्रकल्पग्रस्त लाभार्थी आपल्या विविध मागण्यासाठी लेढीधरणावरच साखळी उपोषण सुरू केले आहे. १९८४ साली रावणगाव गोणेगांव येथील लेढीनदीवर लेढी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
या धरणामध्ये रावणगाव,भाटापुर, हासनाळ,कोळनूर,भिगोली, भेंडेगाव खु भेंडेगाव, भारजवाडी, भासवाडी, इटग्याळ,मुक्रामाबाद,वळकी,प्र.मु.या बाधित बारा गावातील प्रकल्पग्रस्तांची शेती व घरे अतिशय अल्पदरात काडून घेऊन त्याना उघडयावर सोडून दिल्याची भावना प्रकल्पग्रस्त व्यक्त करीत आहेत.
गेल्या ३९ वर्षापासून प्रकल्पग्रस्ताचे मावेजा,पुनर्वसनाचा,लग्न न झालेल्या मुलाचे प्रश्न सुटलेला नसतानाही सरकारकडून धरणपुर्ण करण्यासाठी हालचाली वाडविल्या आसल्यामुळे बारा गावातील प्रकल्पग्रस्तांकडुन धरणाच्या कामाला विरोध करीत आसून आगोदर,शेती,घराचे,मावेजा,पुनर्वसन,मंगच धरण या २००६च्या शासकीय नियमाप्रमाणे सर्व बारा गावाचे भौतिक सुविधासह पुनर्वसनाचे काम पुर्ण करा तरच धरणाच्या बाद कामाला हात लावा. धरणग्रस्त बारा गावातील सर्व सुशिक्षित बेरोजगार प्रत्येकी १५००००० पंधरा लाख द्यावे. संपादीत २हजार ३३१ हेक्टर जमीनस २०१३ कायदा लागू करण्यात यावे भूखंड नसतील त्याठिकाणी सरसकट
स्वेच्छा पुनर्वसन लागू करण्यात यावे१८वर्षावरील मुला -मुलीना वाडिव कुटुंबात समाविष्ट करून घेण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी बुडित क्षेत्रातील बारा गावाच्या प्रकल्पग्रस्तांनी रावणगाव गोणेगांव येथील लेढीधरणावरच साखळी उपोषण सुरू केले आहे.
लेढीधरणावरील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी लेढीधरण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संघर्षमय लढा सुरूच राहणार आसल्याची भुमिका घेतली आहे.