KINWATTODAYSNEWS

खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान मिळाले नाही तर आमदार कल्याणकरांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करून काळी दिवाळी साजरी करणार… सीटू

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.१०.सीटू कामगार संघटनेने नांदेड शहरातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान आणि ५० किलो अन्न धान्य मिळावे म्हणून महापालिका,तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आतापर्यंत डझनभर तीव्र आंदोलने केली.महापालिकेच्या आवक जावक विभागात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नुकसानग्रस्तांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सर्वेक्षण करणाऱ्या तलाठी आणि महापालिकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी अर्जदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करून पात्र यादी देणे गरजेचे होते आणि तशी मागणी देखील संघटनेने वेळोवेळी प्रशासनाकडे केली आहे.परंतु खऱ्या पूरग्रस्तांना डावलून बहुतांश बोगस पूरग्रस्तांनाच पैसे वर्ग केले जात आहेत.

उपोषण,मोर्चे,धरणे आणि सत्याग्रह करून थकलेले पूरग्रस्त शेवटचा पर्याय म्हणून व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीष महाजन यांचे विश्वासू प्रतिनिधी असलेले नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघांचे आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या निवासस्थाना समोर उपोषणास बसून दिवाळी साजरी करणार आहेत.

आंदोलनाच्या रेट्यामुळे आणि आमदार कल्याणकरांच्या मंत्रालयीन पाठपुराव्यामुळे नांदेड शहरातील पूरग्रस्तांना अनुदान मंजूर झाले आहे परंतु खऱ्या पूरग्रस्तांना पात्र यादी मधून डावलण्यात आले आहे. बील कलेक्टर आणि तलाठ्यांनी आपल्या मर्जीतील आणि सत्येत असलेल्या पुढाऱ्यांनी सीफारस केलेल्या लोकांची नावे पात्र यादीत टाकली आहेत.त्यामुळे खऱ्या पूरग्रस्तांवर अन्याय झाला असून त्यांची नावे तातडीने पात्र यादीत टाकावी ही मागणी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
राहिलेल्या खऱ्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा म्हणून जिल्हाधिकारी,तहसीलदार आणि महापालिका आयुक्त यांना निवेदने देऊन मोर्चे आंदोलने करण्यात आली आहेत. काही घरातील तीन ते चार जणांना पात्र ठरवून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे पैसे बँक खात्यात पैसे वर्ग होत आहेत.

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अर्ज भरलेल्या लोकांची यादी जाणीवपूर्वक वरिष्ठाना दिली नाही. आणि हे त्यांना भविष्यात महाग पडणार आहे.

जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी शब्द दिल्यामुळे तीन नोव्हेंबर रोजी उपोषण सोडविले आहे. दहा ते बारा आंदोलने करून सुद्धा दखल घेतली नाही म्हणून दि.१२ नोव्हेंबर रोज रविवार पासून बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन आमदार कल्याणकर यांच्या निवास्थाना समोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीडित पूरग्रस्त काळी दिवाळी साजरी करणार आहेत.त्याचे कारण असे की,राहिलेल्या खऱ्या पूरग्रस्तांना तातडीने अनुदान देण्यात यावे.५० किलो अन्न धान्य देण्यात यावे. तसेच महापालिकेच्या वसुली लिपिक आणि सर्वे करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करावी ही मागणी करण्यात येणार आहे.
अशी माहीती सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

66 Views
बातमी शेअर करा