राष्ट्रीय बिरसा क्रांन्ती दल आदिवासी संघटना नांदेड ग्रामीण जिल्हातून शुभेच्छाच्या वर्षाव -क्रांतीसुर्य महामानव भंगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औपचारिक साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी समस्त आदिवासी समाजाला घोषणा केली व न्या दिल्या बदल आभारकर्त्त , आदिवासी नेते _जितेंन्द्र अ.कुलसंगे , रमेंश कोवे ‘ जिल्हध्यक्ष नांदेड ग्रा.*
यवतमाळ: दि.३० ऑक्टोबर २०२३ला ” शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी “बिरसा मुंडा स्मारक व आदिवासी वास्तुसंग्रहालयासाठी” ५० कोटींची तरतूद करणार असल्याची सकारात्मक घोषणा केली.यवतमाळची आदिवासी जिल्हा म्हणून ओळख आहे.आदिवासी समाजाने जिल्ह्यात बिरसा मुंडा स्मारक व आदिवासी वास्तुसंग्रहालय व्हावे यासाठी अनेकदा मागणी केलेली आहे.ही आदिवासीची मागणी घेवुन मा.ना.संजयभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे सतत पाठपुरावा केला.त्या पाठपुराव्यामुळेच मा.ना.मुख्यमंत्री साहेबांनी यवतमाळ येथे भव्य असे बिरसा मुंडा स्मारक व आदिवासी वास्तुसंग्रहालय उभारणार असल्याची सकारात्मक घोषणा “शासन आपल्या दारी ” या कार्यक्रमात केली.
ही मागणी “बिरसा क्रांती दल ” ह्या संघटनेने सातत्याने पाठपुरावा करुन केली आहे. या वास्तुसंग्रहालयासाठी २८ एकर जागा प्रस्तावित केलेली.आहे.मा.ना.संजयभाऊ राठोड यांनी प्रशासकीय यंत्रणेला सक्रिय करुन प्राथमिक उभारणीसाठी ५० कोटीची तरतूद करण्याचे योजले आहे.
या आदिवासी समुदायाच्या मागणीला मा.ना.मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक जाहीरपणे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बिरसा क्रांती दल संघटनेमार्फत मुख्यमंत्री महोदयांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.ज्यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी शक्य झाली ते जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आदिवासी समुदायाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मा.दशरथ मडावी , संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांती दल सोबत रंगराव काळे, डी.बी.अंबुरे, किरणभाऊ कुमरे,प्रा.कैलास बोके, रमेश भिसनकार, संजय मडावी, तुकाराम जुमनाके, नागोराव गेडाम, शरद चांदेकर, रमेश मडावी, मेजर जीवन कोवे, मेजर जगत चव्हाण, पियुष सलाम, बिपिन आत्राम, अरविंद मडावी, अजित कोवे,बाळू वगारहांडे,आदर्श कुळसंगे, नितीन कोवे,शिवम ढाकरे,निखिल उईके, अर्पित कुमरे,राजेश उईके, शिवम वगारहांडे आदी उपस्थित होते.