KINWATTODAYSNEWS

आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर आनंद अरनॉल्ड यांच्या हस्ते*मोनिका फिटनेस क्लबचे आज ६ रोजी उद्घाटन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.6.नांदेड शहरातील मध्यवर्ती भागात श्रीनगर-वर्कशॉप कॉर्नर परिसरात खास मुली व महिलांच्या आरोग्य व फिटनेससाठी मोनिका फिटनेस क्लब सुरू करण्यात येत असून यात मुली आणि महिलांच्या उत्तम फिटनेससाठी झुंबा, योगा, एरोबिक्स, कार्डिओ, क्रॉसफिट, डाएट प्लॅन आणि मुली व महिलांच्या उत्तम आरोग्य आणि फिटनेससाठी दररोज मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

मोनिका फिटनेस क्लबचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर तथा मिस्टर इंडिया आनंद अरनॉल्ड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मंगळवार,दि. 7 नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर आनंद अरनॉल्ड हे नांदेडकरांना फिटनेसच्या महत्वपूर्ण टिप्स अभासी पद्धतीने देणार असून सदरील कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन मोनिका फिटनेस क्लबच्या संचालिका मोनिका नांदेडकर यांनी केले आहे.

127 Views
बातमी शेअर करा