KINWATTODAYSNEWS

नेत्रालय नांदेड येथे मधुमेही रूग्णांसाठीमोफत रेटिना तपासणी शिबीर संपन्न

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.6.मधुमेही (डायबिटीसच्या) रुग्णांसाठी डोळ्याच्या मागच्या पडद्याचे म्हणजेच रेटिनाची तपासणी व एक वेळ रक्तातील साखर तपासणी मोफत करण्यासाठी शिबीर मोतेवार नेत्रालय नांदेड येथे रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी घेण्यात आले.
दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस आपण जागतिक मधुमेह दिन असा साजरा करतो. त्यानिमित्तानेच यावर्षी 5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी व मोतेवार नेत्रालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेही रुग्णांसाठी रेटिना तपासणी शिबीर आयोजित केले होते.

मधुमेही रुग्णांना डोळ्यांमध्ये रक्तवाहिन्या पातळ होऊन डोळ्यात रक्तस्त्राव होण्याची व त्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते.तो रक्तस्त्राव टाळण्यासाठी वर्षातून किमान एक वेळा डोळ्यांच्या नेत्रपटलाची म्हणजेच रेटिनाची तपासणी करणे आवश्यक असते.ही तपासणी शिबिरातील सर्व रुग्णांना मोफत केली गेली. ज्या रुग्णांना रेटिना अँजिओग्राफी,लेझर उपचार, डोळ्याच्या शस्त्रक्रिया यांची आवश्यकता असेल त्या रुग्णांना शिबिरानंतर सवलतीच्या दरात हे सर्व उपचार केले जातील, असे आयोजकांनी कळवले आहे.
या शिबिराचा शंभरहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.सदरील शिबिरात जपान येथील फंडस कॅमेरा या मशीनद्वारे सर्व रुग्णांची रेटनाचे फोटो काढून तपासणी करण्यात आली. सर्वांना डायबेटिक रेटीनोपॅथीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व योग्य ते उपचार मोफत करण्यात आले.

मोतेवार नेत्रालय नांदेड येथील सर्व नेत्रतज्ज्ञ डॉ.विवेक मोतेवार,डॉ.अनिकेत काळेगोरे, डॉ.जमीमा शेख व डॉ.नीता भोसले तसेच नेत्रालयातील तंत्रज्ञ ऋषिकेश अदनाक,पंडित विभुते,निलेश खोडके व मॅनेजर शीलसेन भदरगे यांनी परिश्रम घेतले

164 Views
बातमी शेअर करा