KINWATTODAYSNEWS

के.चंद्रशेखरराव,सिमावर्ती जिल्‍हयातील मतदार दुध खुळा समजु नका ‘‘तुम्‍हाला BRS पक्ष सीमावर्ती भागात वाढवायचा असेल तर, बाभळी बंधा-याचा प्रश्‍न दोन्‍ही राज्‍यांच्‍या समन्‍वयाने सोडविण्‍यासाठी पुढाकार घ्‍या

*बाभळी बंधा-याचा प्रश्‍न दोन्‍ही राज्‍यांच्‍या समन्‍वयाने सोडविण्‍यासाठी पुढाकार घ्‍या,तरच तुम्‍ही व तुमच्‍या पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांना लोक फिरु देतील, अन्‍यथा चंद्रबाबु नायडु व तेदेपाचे जे झाले,तेच होईल’’- रोशनगावकर*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.५.जिल्यातील बहूचर्चीत धर्माबाद तालुक्या मधील इ.स.1993 मध्‍ये तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मा.शरदचंद्र पवार यांनी पाटबंधारे मत्री, मा.रोहिदास पाटील यांचा गोदावरी नदीवर बाभळी (जि.नांदेड) येथे उच्‍च पातळी बंधा-याला मंजुरी मिळावी असा आग्रहपुर्वक प्रस्‍ताव मांडला. सदर प्रस्‍तावाला मंत्री मंडळानी मान्‍यता देऊन आर्थिक तरतुद पण केली.

मंजुरी नंतर राज्‍यात सतांतर झाले व बाभळी बंधा-याची फाईल धुळ खात अडगळीत फेकली गेली.पण तत्‍कालीन सभागृहातील अभ्‍यासु आमदार मा.भास्‍करराव पाटील, मा.डॉ.माधवराव किन्‍हाळकर व शिक्षक आमदार मा.प.म.पाटील यांनी सभागृहात वैधनिक अस्‍त्र तारांकित प्रश्‍न,लक्षवेधी सुचना ई. अस्‍त्राचा उपयोग करुन, बाभळी बंधा-याचा विषय जीवंत ठेवला.

पुन्‍हा सत्‍तांतर होऊन कै.विलासराव देशमुखांचे सरकार सत्‍तेत आले.त्‍यांनी कृति समितीच्‍या पाठपुराव्‍यावरुन तत्‍कालीन औरंगाबाद येथे झालेल्‍या दिनांक 28 फेब्रुवारी 2001 रोजी मंत्री मंडळाच्‍या बैठकित सर्व पक्षिय बाभळी बंधारा कृती समितीच्‍या निवेदनावरुन बाभळी उच्‍च पातळी बंधारा निर्माण कार्यास मंत्रीमंडळानी अग्रक्रमाने मान्‍यता देऊन, 1 ल्‍या प्रशासकिय मान्‍यतेनंतर इ.स.2000 पर्यंत आर्थिक तरतुद न केलयामुळे दिनांक 14.02.2003 रोजी सुधारित प्रशासकिय मान्‍यता 92.60 कोटी रुपये दिली. मुख्‍यमंत्री पदी मा.सुशीलकुमार शिंदे होते,दिनांक 19 ऑगस्‍ट 2004 रोजी तत्‍कालीन ग्रामीण विकासमंत्री मा.सुर्यकांता पाटील,भारत सरकार यांचे हस्‍ते भुमीपुजन करण्‍यात येऊन तेलंगण्‍याचे माजी मुख्‍यमंत्री चंद्राबाबु नायडु व त्‍यांच्‍या सहका-यांनी बाभळी बंधारा बांधकामास अडथळे आणुन आंदोलन उभे केले.पण धर्माबाद-बिलोली-उमरी-नायगाव तालुक्‍यातील गोदावरी खो-यातील सामान्‍य जनता पेटुन उठली.जिल्‍हयातील सर्व पक्षिय आमदार-खासदार व पदाधिका-यांनी तेलंगण्‍यांच्‍या विरुध्‍द भक्‍कम एकजुट सभागृहात व सभागृहाबाहेर दाखविले.तेलंगी गनिमी काव्‍याने बाभळी बंधा-यापर्यंत पोंहचुन बांधकाम बंद पाडण्‍यासाठी घुसखोरी करण्‍याच्‍या प्रेयत्नात होते.

निजामाबादचे खासदार कार्यकर्त्‍यांचा मोठा फौजफादा व मिडीया घेऊन बाभळीला पोंहचला.गोदावरी खो-यातील बहादुर आंदोलकानी बांधकामाकडे जाणा-या रस्‍त्‍यावर झाडे तोडुन टाकली व रस्‍ता बंद पाडला.इतकेच नव्‍हें तर विरांगणानी अनेक घुसखोरांना बदडुन काढले, घुसखोर पळुन गेले. त्‍यानंतरही भाजपा महिला नावेतुन (होडी) बंधा-याकडे निघाला, तयांना ही गोदाकाठच्‍या महिलांनी पिटाळुन लावले.

मग चंद्राबाबु नायडु राजकिय लाभासाठी मोठ्या फौजफाटयासह अनेक वेळा सिमा ओलांडुन बंधा-याकडे पोंहचण्‍याची वल्‍गणा करु लागला.महाराष्‍ट्र पोलीसांनी त्‍याला सिमेवर रोकले.वरिष्‍ठ पोलीस अधिका-यांनी त्‍याला परत जाण्‍याचा सल्‍ला दिला. पण तो दांडगाई करु लागला. शेवटी अधिका-यांनी त्‍याला व त्‍याच्‍या सोबतच्‍या माजी खासदार,आमदार व पदाधिका-यांना अटक करुन धर्माबाद येथील आय.टी.आय. ला तुरुंगाचा दर्जा देऊन,तिथे ठेवले.जामीनावर सोडण्‍याची तयारी दर्शविली पण मी बाभळी बंधा-याला जाणार असा हट्ट करु लागला.शेवटी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मा.अशेकराव चव्‍हाणांनी त्‍याला व त्‍याच्‍या समर्थकाला बंदोबस्‍तात औरंगाबाद विमानतळावर पोंहचुन जाण्‍यास नकार देतांना ही, हे नको असलेले पार्सल विमानात कोंबुन हैद्राबादला रवाना केले.

मग अनेक तेलंगणण्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात बांधकाम बंद पाडण्‍यासाठी याचिका दाखल केल्‍या.महाराष्‍ट्र शासन व बाभळी बंधारा कृती समीतीने तज्ञ विधिज्ञ ठेवुन न्‍यायालयात ही आपली बाजु भक्‍कम मांडली.दरम्‍यान राज्‍याचे मुख्‍यमंत्री कै.विलासराव यांनी निवडक मंत्र्यासह, कृति समितीच्‍या पदाधिका-यांसह तत्‍कालीन प्रधानमंत्री मा.मनमोहनसिंह यांची शिष्‍ट मंडळासह भेट घेतली.आपली बाजु न्‍याय असल्‍याचे मांडले.
सर्वोच्‍च न्‍यायालयाने दोन्‍ही राज्‍याचे म्‍हणणे व पुरावे पडताळुन इ.स.2013 मध्‍ये महाराष्‍ट्रावर कांही अटी घालु न्‍याय दिला.न्‍यायालयीन आदेशात 1 जुलै ते 29 ऑक्‍टोंबर पर्यंत बंधारेचे गेट उघडे असतील.20 ऑक्‍टोंबर रोजी गेट बंद करुन 1 मार्च रोजी गेट उचलुन तेलंगणात 0.10 TMC पाणी सोडावे असे सुचित केले.हा महाराष्‍टावर अन्‍यायच आहे, त्‍या विरुध्‍द सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करुन न्‍याय मिळवु असे सत्‍तारुढ पक्षाचे प्रत्‍येक मुख्‍यमंत्री म्‍हणतो, पण असे घडत नाही.

दोन्‍ही राज्‍यातील मुख्‍यमंत्र्यांनी समन्‍वयातुन मार्ग काढावा व गोदावरी खो-यातील शेतक-यांनी शाश्‍वत लाभ मिळावा असा टाहो फोडला पण ऐकतो कोण? आता तर BRS पक्षाने सिमालगतच्‍या मतदार संघात निवडणुक लढविण्‍याची तयारी चालविली आहे.

खरे तर बाभळी बंध-याचा समन्‍वयाने तोडगा काढल्‍याशिवाय BRS पक्षाला राज्‍यात पाय ठेवु देऊ नये,असा निर्धार करुन कामाला लागा.बाभळी बंधाराचा प्रश्न दोन्ही राज्याच्या सरकारने समन्वयाने सोडवावा अशी मागणी शंकराव पाटील जाधव रोशनगावकर यांनी केली आहे.

83 Views
बातमी शेअर करा