KINWATTODAYSNEWS

अवैधरित्या कटसाईज सागी नग वाहतूक होत असतांना गस्तीपथकाने केले जप्त

किनवट (प्रतिनिधी ) : – वनविभागाचे गस्ती पथक गस्त करीत असताना गोकुंदा येथील पेट्रोल पंपासमोर दुपारच्या सुमारास मोटारसायकलवर अवैधरित्या कटसाईज सागी नग वाहतूक होत असतांना गस्तीपथकाला बघून तस्करांनी दुरुनच अवैध सागी माल जागेवरच सोडून पोबारा केला .घटनास्थळी अवैधमाल जप्त करून वनविभागाने वन गुन्हा नोंदविला आहे .
दि . 4 रोजी गोकूंदा पेट्रोल पंपासमोर दुपारच्या सुमारास वनविभागाचे गस्तीपथक गस्त करत असतांना विना नंबरच्या मोटारसायकलवर अवैधरित्या कटसाईज सागी नग वाहतूक होत असतांना दिसूनवन कर्मचाऱ्यांच्या नजरेस आले .मोटारसायकलवरील आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी दूरूनूच मोटार सायकल व अवैध सागी करसाईज माल जागेवरच सोडून पसार झाले घटनास्थळावरून सागवान कटसाईज 13 नग 0.0984 घमीज्याचे माल किंमत दोन हजार रुपये व मोटरसायकल अंदाजे किंमत वीस हजार रुपये असा 22 हजार रुपयाचा माल जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध वन गुन्हा नोंदविला आहे .उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे . सहाय्यक संरक्षक जी.डी.गिरी . वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) किनवट पी. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चिखली एम. एन.कत्तूलवार ,वनरक्षक रवी दांडेगावकर ,अनिल फोले, वनमजूर भावसिंग जाधव .नूरमामू तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवले आदी वन कर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली .

240 Views
बातमी शेअर करा