किनवट: तालुक्यातील ग्रामपंचायत परसराम नाईक तांडा तालुका किनवट येथील प्रभाग क्र.03 मधील मतदार यादी मध्ये तलाठी कदम उमेदवार उज्वला प्रवीण पवार पती प्रवीण रामचंद्र पवार त्यांना सहकार्य करणारे अविनाश मोहन जाधव व संबंधित अधिकाऱ्याकडून आमची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे,
किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत परसराम तांडा येथील होणाऱ्या 05/11/2023 रोजी निवडणूक मतदान आहे
व दि.18 ते 20/10/2023 या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले व दि.23/10/2023 रोजी प्रभाग क्र 01-02-03 छाननी झाली व प्रभाग क्रमांक 01 व प्रभाग क्रमांक 02 मध्ये अर्ज वापस घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली व प्रभाग क्रमांक 03 निवडणूक होणार निवडणुकीचा चिन्ह मिळाले सर्व लोकप्रचाराला लागले आणि दि.28/10/2023 रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान विरोधकाकडून गावात अशी चर्चा होती की प्रभाग क्र.01 व प्रभाग क्र.02 मधील आपले ते 12 मतदार तलाठी कदम व संबंधित अधिकाऱ्याला धरून आपले 12 मतदान प्रभाग क्रमांक 03 मध्ये पुरवणी यादी मध्ये समाविष्ट केले व त्यांचे मतदान कट केले अशी जोरदार विरोधकाकडून सोशल मीडिया WhatsApp वर व गावात चर्चा सुरू होती व हा सर्व प्रकार ऐकून आम्ही दि.28/10/2023 वेळ 12 वाजता किनवट तहसील कार्यालय येथे पाहणी केली असता विरोधकांचे ते 12 मतदार पुरवणी यादी मध्ये समाविष्ट केलेले दिसून आले,
प्रभाग क्र.03 मधील उमेदवार उज्वला प्रवीण पवार त्यांच्या पती प्रवीण रामचंद्र पवार व त्याला सहकार्य करणाऱ्या अविनाश मोहन जाधव तलाठी कदम यांच्या संगनमताने परस्पर धाब्यावर बसून परस्पर पुरवणी मतदार यादी समाविष्ट केली आहे
सर्व बाबीची गांभीर्याने नोंद घ्यावी तात्काळ चौकशी करून प्रभाग क्र.03 चे उमेदवार उज्वला प्रवीण पवार पती प्रवीण रामचंद्र पवार अविनाश मोहन जाधव तलाठी कदम व संबंधित अधिकाऱ्यावर
तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा अन्यथा आम्हाला या निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्हाला लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करावा लागेल असे लेखी निवेदन प्रभाग क्र.03 चे उमेदवार व गावकऱ्यांतर्फे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य आमदार भीमराव केराम जिल्हाधिकारी नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तहसीलदार किनवट यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे