KINWATTODAYSNEWS

पंचवीस वर्षापासून मध्यम प्रकल्प मांडवीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून शेतकरी वंचित राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल .!

किनवट/नांदेड:
राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या मागणीला मिळाल यश, चोवीस तासाच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाची घेतली दाखल बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालय तर्फे दखल घेण्यात आली नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी गावच्या मध्यम प्रकल्प मांडवी शिवारातील शिंगोडा, लिंगी, उनकेश्वर, लिंगी तांडा, या शिवारातून जात असलेल्या डाव्या व उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यापासून आदिवासी शेतकरी बांधव गेली पंचवीस वर्ष वंचित आहे. या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनी बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केला, तरी सुद्धा न्याय मिळाला नाही. या संदर्भामध्ये मांडवी गावच्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेकडे न्याय मागितला असता बिरसा क्रांतीदल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आदिवासी संघटना बिरसा क्रांती दल शाखा किनवट संघटनेच्या वतीने, किनवटच्या उपविभागीय कार्यालय मार्फत भारत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू ,भारताचे पंतप्रधान मा श्रीमान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा गिरिषजी महाजन,यांना राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर ऑनलाइन ईमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले चोवीस तासाच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन पाठवलेल्या ईमेलची दखल घेतली ई-मेल मध्ये जो निरोप देण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे त्याचे मी वाचन करून तुम्हाला दाखवतो माननीय महोदय धन्यवाद आपला ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कारवाईसाठी संबंधित विभागास पाठविण्यात आला आहे नोंदणी शाखा मुख्यमंत्री कार्यालय असा निरोप या ईमेल मध्ये देण्यात आला. यावेळी रमेश मारोती कोवे बिरसा क्रांती दल कर्मचारी संघटना नांदेड ग्रा.जिल्हाअध्यक्ष, जितेंद्र अनिलराव कुलसंगे ग्रा.जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बिरसा क्रांती दल नांदेड, अशोक आबाराव सीडाम कार्याध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड ग्रा., प्रणय रमेश कोवे बिरसा क्रांती दल नांदेड जिल्हा मीडिया अध्यक्ष,शैलेश मनोहर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड, मोहन लक्ष्मण कनाके मांडवी सर्कल अध्यक्ष बिरसा क्रांतीदल नांदेड,

संदीप दत्ता कन्नाके जिल्हा संघटक बिरसा क्रांतीदल नांदेड,रमेश परचाके जिल्हा संपर्क प्रमुख बिरसा क्रांती दल नांदेड,अशोक नैताम किनवट माहूर विधानसभा प्रभारी,संतोष पाडुरंग कनाके जिल्हा संघटक राष्ट्रीय बिरसा क्रांती दल नांदेड ग्रा. जिल्हा शाखा किनवटच्या बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांचे आभार मानले .!

161 Views
बातमी शेअर करा