किनवट/प्रतिनिधी: मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थनार्थ किनवट येथे आमरण उपोषण करण्यासाठी मराठा समाजातील तीन युवक अमरदिप कदम, गोविंद अरसोड,प्रकाश गोरे हे अमरण उपोषणास बसले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी काल आपले आमरण उपोषण मागे घेतले व सर्वांना आवाहन केले की, कोणीही आमरण उपोषण न करता साखळी उपोषण करावे.
त्यानुसार येथील आमरण उपोषण किनवट येथील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव व पोलीस निरीक्षक माननीय बोरसे साहेब यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळेस समाज बांधव उपस्थित होते.
159 Views